Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...

हार्दिक पांड्यासंदर्भात काय म्हणाले कोच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 21:10 IST

Open in App

IPL 2026 MI vs RR Hardik Pandya Comeback :  राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळाला आहे. कर्णधार हार्दिक पांड्या गुवाहटीच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त असल्याची पुष्टी MI संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या यंदाच्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. सलामीच्या लढतीत १३ वर्षांनी विजयी सलामी दिल्यावर दुसऱ्या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या कमबॅकसह MI पुन्हा दमदार कमबॅक करेल, अशी आशा आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हार्दिक पांड्यासंदर्भात काय म्हणाले कोच?

मुंबई इंडियन्सचा संघ गुवाहटीच्या मैदानात राजस्थान रॉयल्स विरुद्ध तिसरा सामना खेळणार आहे. या सामन्याआधी पत्रकार परिषदेत पारस म्हांब्रे यांनी MI च्या कर्णधाराच्या फिटेससंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, "हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनच्या गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध आहे. या सामन्याआधी त्याने नेट प्रॅक्टिस केली आहे. त्याला कोणत्याही प्रकारच्या दुखापतीची समस्या नाही. तो आजाही पडल्यामुळे दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता." 

IPL Unique Record : किंग कोहलीनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम; जाणून घ्या सविस्तर

पांड्याच्या जागी दीपक चाहरला मिळाली होती संधी

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सच्या संघाने दीपक चाहरला संधी दिली होती. त्याने लोकेश राहुलच्या रुपात पहिल्याच षटकात संघाला यश मिळवून दिले. पण चांगल्या सुरुवातीनंतरही १६२ धावांचा बचाव करण्यात MI चा संघ अपयशी ठरला होता. हार्दिक पांड्याच्या कमबॅकनंतर कुणाला बाकावर बसवण्यात येणार तेही पाहण्याजोगे असेल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Hardik Pandya to Play? MI Coach Clarifies Absence.

Web Summary : Hardik Pandya is fit for the MI vs RR match after missing the previous game due to illness, not injury. He practiced well and his return is expected to boost MI's performance after a loss.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्सहार्दिक पांड्याआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग