Join us
Daily Top 2Weekly Top 5

Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं

MI विरुद्ध अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा पहिलाच फलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 21:25 IST

Open in App

Virat Kohli Scripts History Becomes 1st Batter In The World To Score 1000 Runs : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी कर्णधार आणि स्टार बॅटर विराट कोहली याने दमदार अर्धशतक झळकावले. ३८ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावा करून तो तंबूत परतला. हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादव करवी त्याला झेलबाद केले. पण विकेट गमावण्याआधी विराट कोहलीनंमुंबई इंडियन्सविरुद्ध १००० धावांचा टप्पा पार केला. MI विरुद्ध अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वानखेडेच्या मैदानात ११ चेंडूत २० धावा करताच विराट कोहलीनं मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी कामगिरी नोंदवली. विराट कोहलीनं आयपीएलसह चॅम्पियन्स लीग स्पर्धेत मिळून मुंबई इंडियन्सविरुद्ध हजार धावा केल्या आहेत. या यादीत लोकेश राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्सविरुद्ध ९७७ धावा केल्या आहेत. शिखर धवन याच्या नावे मुंबई इंडियन्सविरुद्ध ९०१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Virat Kohli Creates History: First to 1000 Runs Against MI

Web Summary : Virat Kohli achieved a historic milestone, becoming the first batter globally to score 1000 runs against Mumbai Indians. He reached this feat at Wankhede Stadium, surpassing Lokesh Rahul and Shikhar Dhawan in runs against MI.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली