Virat Kohli Scripts History Becomes 1st Batter In The World To Score 1000 Runs : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी कर्णधार आणि स्टार बॅटर विराट कोहली याने दमदार अर्धशतक झळकावले. ३८ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावा करून तो तंबूत परतला. हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादव करवी त्याला झेलबाद केले. पण विकेट गमावण्याआधी विराट कोहलीनंमुंबई इंडियन्सविरुद्ध १००० धावांचा टप्पा पार केला. MI विरुद्ध अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई इंडियन्सविरुद्ध अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
वानखेडेच्या मैदानात ११ चेंडूत २० धावा करताच विराट कोहलीनं मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी कामगिरी नोंदवली. विराट कोहलीनं आयपीएलसह चॅम्पियन्स लीग स्पर्धेत मिळून मुंबई इंडियन्सविरुद्ध हजार धावा केल्या आहेत. या यादीत लोकेश राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्सविरुद्ध ९७७ धावा केल्या आहेत. शिखर धवन याच्या नावे मुंबई इंडियन्सविरुद्ध ९०१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
MI विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे आघाडीचे ६ फलंदाज
- विराट कोहली १००१* धावा |३७ सामने | स्ट्राईक रेट: १२९.६६
- केएल राहुल ९७७ धावा | २१ सामने | स्ट्राईक रेट: १३५.१३
- शिखर धवन ९०१ धावा | २८ सामने | स्ट्राईक रेट: १२८.३४
- अजिंक्य रहाणे ८८८ धावा | ३२ सामने | स्ट्राईक रेट: १२८.१३
- सुरेश रैना ८५० धावा | ३६ सामने | स्ट्राईक रेट: १३८.२१
- महेंद्रसिंह धोनी ८२९ धावा | ४६ सामने | स्ट्राईक रेट: १३३.०६