Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक

RCB चा वानखेडेवरील विजयाचा सिलसिला कायम; पहिल्या विजयानंतर MI चं गणित बिघडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 23:58 IST

Open in App

IPL 2026  Royal Challengers Bengaluru Won By 18 Runs Against Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा बालेकिल्ला असलेल्या वानखेडेच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पुन्हा एकदा हवा केली. आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगाातील रविवारी खेळवण्यात आलेल्या १९ व्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने मुंबई इंडियन्ससमोर २४१ धावांचे विक्रमी लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित २० षटकात ५ बाद २२२  धावांपर्यंतच मजल मारु शकला. स्नायू दुखापतीमुळे पॉवर प्लेमध्ये सलामीवीर रोहित शर्मानं मैदान सोडलं तिथंच RCB नं सामन्यावर पकड मिळवली. शेरफेन रुदरफोर्डच्या नाबाद अर्धशतकाशिवाय हार्दिक पांड्याच्या २२ चेंडूतील ४० धावांच्या खेळीशिवाय एकालाही धमक दाखवता आली नाही. गत हंगामात दहा वर्षांनी RCB नं वानखेडेवर विजय नोंदवला होता. हा सिलसिला यंदाच्या हंगामातही त्यांनी कायम ठेवला. 

पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीचा सलामीवीर फिल सॉल्ट ७८ (३६) आणि विराट कोहली ५० (३८) यांनी पहिल्या विकेटसाठी ६५ चेंडूत १२० धावांची दमदार भागीदारी रचली. या दोघांनी आपली जबाबदारी चोख बजावल्यावर कर्णधार रजत पाटीदार याने अवघ्या २० चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५३ धावांची कडक खेळी केली. अखेरच्या षटकात टिम डेविड याने १६ चेंडूत केलेल्या ३४ धावांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद २४० धावा करत मुंबई इंडियन्ससमोर २४१ धावांचे विक्रमी टार्गेट सेट केले होते. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit's exit turned the match; RCB defeats MI at Wankhede.

Web Summary : RCB defeated MI at Wankhede after setting a 241-run target. Rohit's injury exit shifted momentum. Salt, Kohli, and Patidar shone with the bat contributing to RCB's victory, while MI's batting faltered despite some resistance from Hardik Pandya. RCB won by 18 runs.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोररोहित शर्माविराट कोहलीआयपीएल २०२४