Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव

तुफान फटकेबाजीसह फिल सॉल्टनं साधला मोठा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 20:51 IST

Open in App

IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record With Fiery Fifty फिल सॉल्टनं राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर 'गोल्डन डक'ची नामुष्की ओढावल्याचा सगळा राग मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजावर काढल्याचे पाहायला मिळाले. वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या सलामीवीराने यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावताना संघाला दमदार सुरुवात करून दिली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

तुफान फटकेबाजीसह फिल सॉल्टनं साधला मोठा डाव

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सॉल्टनं उत्तुंग फटकेबाजीसह मोठा डावही साधला. या सामन्यात तो शतकी धमाका करण्याच्या मूडमध्ये होता. पण लॉर्ड शार्दुल ठाकूर मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला. हार्दिक पांड्याकरवी त्याने फिल सॉल्टला झेल बाद केले. सॉल्टनं स्फोटक फलंदाजी करताना  करत तंबूचा रस्ता दाखवला. ३६ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ७८ धावांची दमदार खेळी केली. यासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ३५० षटकार मारण्याच्या पल्ला गाठला. 

'गोल्डन डक'चा लाजिरवाणा रेकॉर्ड

आयपीएलच्या हंगामातील पहिल्या सामन्यात अवघ्या ८ धावांवर अडखळलेल्या सॉल्टनं चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ३० चेंडूत ४६ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यात त्याचे अर्धशतक अवघ्या ४ धावांनी हुकले होते.  राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. IPL मध्ये तिसऱ्यांदा 'गोल्डन डक'सह त्याच्या नावे लाजिरावाणा विक्रमाची नोंद झाली. पण मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने दमदार कमबॅक करत खास खेळीसह संघाला मजबूत सुरुवात करून दिली. 

बेभान सेलिब्रेसन

फिल सॉल्ट याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ६६ चेंडूत १२० धावांची दमदार भागीदारी रचली. अर्धशतक झळकावल्यावर फिल सॉल्टन आक्रम अंदाजात आणि आक्षेपार्ह हावभाव करत सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. यामागचं कारण त्याचा मुंबई इंडियन्सविरुद्धची खराब कामगिरी होती. आयपीएलमधील मागील तीन सामन्यात फिल सॉल्टला मुंबई इंडियन्स विरुद्ध दुहेरी आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळेच यावेळी मोठी खेळी केल्यावर त्याने बेभान होऊन  सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Phil Salt's explosive innings against MI: Century missed, big record achieved.

Web Summary : Phil Salt smashed a fiery fifty against Mumbai Indians, overcoming a previous golden duck. He scored 78 off 36 balls, hitting 6 sixes and reaching 350 T20 sixes. Salt's aggressive celebration stemmed from past failures against MI.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर