IPL 2026 MI And RCB To Players Wear Black Armbands :आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. सामन्याला सुरुवात होण्याआधी आधी दोन्ही संघांतील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसह स्टेडियमवर उपस्थिती क्रिकेट चाहत्यांनी एक मिनिटांचे मौन बाळगत प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली.
'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ट गायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रविवारी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत क्षेत्रासह वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वानखेडेच्या मैदानातील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीआधी दोन्ही संघातील खेळाडू आणि स्टेडियमवरील उपस्थितीत क्रिकेट चाहत्यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली.