टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन करण्यात सिंहाचा वाटा उचलणारा जसप्रीत बुमराह IPL मध्ये सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. बुमराह हा कोणत्याही खेळपट्टीवर आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवून देण्यासाठी ओळखला जातो. पण IPL मध्ये त्याच्या गोलंदाजीतील धार कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात तो विकेट लेस राहिला. या सामन्यातील कामगिरीसह IPL मधील पाच सामन्यात विकेट लेस राहण्याची नामुष्की त्याच्यावर ओढावली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जसप्रीत बुमराह कधी घेणार पहिली विकेट?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहनं ४ षटकांच्या कोट्यात ३५ धावा खर्च केल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. विकेटची हमी देणारा गोलंदाज कमी पडला अन् RCB च्या संघाने त्याचा फायदा उठवत MI समोर मोठी धावसंख्या उभारली. फिल सॉल्ट, विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर RCB नं निर्धारित २० षटकात ४ बाद २४० धावा केल्या. या सामन्यानंतर आता पुन्हा जसप्रीत बुमराह पहिली विकेट कधी घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
वैभव सूर्यवंशीनंही केली धुलाई, त्यात आणखी एका सामन्यात विकेटची पाटी कोरी
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. हा मुद्दा गाजत असताना जसप्रीत बुमराहची विकेटची पाटी पुन्हा कोरी राहिली. या सामन्याआधी बुमराहचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय नाही, असे MI गोलंदाजी कोच लसिथ मलिंगाने म्हटले होते. पण यंदाच्या हंगामात बुमराह फॉर्ममध्ये कधी येणार हा एक मोठा प्रश्नच आहे.
Web Summary : Jasprit Bumrah, crucial in the T20 World Cup, is struggling in the IPL. He remained wicketless in the match against Royal Challengers Bangalore, marking his fifth such game this IPL season. Questions arise about when he will secure his first wicket.
Web Summary : टी20 विश्व कप में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले जसप्रीत बुमराह आईपीएल में संघर्ष कर रहे हैं। रॉयल चैलेंजर्स बैंगलोर के खिलाफ मैच में वह विकेट लेने में विफल रहे, इस आईपीएल सीजन में उनका यह पांचवां ऐसा मैच है। सवाल उठता है कि वह अपना पहला विकेट कब हासिल करेंगे।