मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा

मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनसह आरसीबीच्या टिम डेविडवर का झाली कारवाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 19:40 IST2026-04-13T19:35:15+5:302026-04-13T19:40:46+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 MI vs RCB Hardik Pandya Fined 12 Lakhs Tim David Also Punished After MI vs RCB Match Know The Reason | मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा

मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा

मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यावर आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याला 'टाईमपास' केल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय RCB च्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या टिम डेविडलाही आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल शिक्षा झाली आहे. त्याला सामन्यातील मानधनाच्या २५ टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

MI च्या कर्णधाराला स्लो ओव्हर रेटचा फटका

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात धीम्या ओव्हरगतीसाठी हा त्याचा पहिलाच गुन्हा होता. याशिवाय टिम डेविडवर सामन्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम कपातीसह खात्यात एक डिमेरिट पॉइंट जमा करण्यात आला आहे. IPL च्या आचारसंहितेतील लेव्हल १ नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. 

IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले

टिम डेविडने दोन वेळा केली चूक

इंडियन प्रीमियर लीगनुसार, टिम डेविडने MI विरुद्धच्या सामन्यात IPL च्या कोड ऑफ कंडक्टच्या कलम २.४ चे उल्लंघन केले. हा नियम सामन्यादरम्यान अंपायरच्या सूचनांचे पालन न करण्याशी संबंधित आहे. RCB च्या डावातील १८ व्या षटकात टीम डेविड फलंदाजी करत होता.  अंपायरने चेंडू बदलल्यानंतर तो चेंडू पाहताना दिसला.  अंपायरने त्याच्याकडे चेंडू मागितल्यावरही त्याने सूचनेचे पालन केले नाही. अखेरच्या षटकात पुन्हा त्याने तीच चूक केली. पंचाच्या सूचनांचे पालन न करता आडमुठेपणा करण्याची किंतम त्याला मोजावी लागली आहे. 

टिम डेविडची ३४ धावांची खेळी

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात धावांची अक्षरश: बरसात झाली. पहिल्यांदा फलंदाजी करताना बंगळुरुच्या संघाकडून  फिल सॉल्ट  (७८ धावा), कर्णधार रजत पाटीदार (५३ धावा) आणि विराट कोहली (५० धावा) या तिघांच्या अर्धशतकानंतर टिम डेविडनं फक्त १६ चेंडूत  नाबाद ३४ धावांची खेळी केली होती. ही खेळी RCB च्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली. कारण RCB च्या संघाने दिलेल्या २४१ धावांचा पाठलाग करताना MI च्या संघाने २२२ धावांपर्यंत मजल मारली. बंगळुरुच्या संघाने फक्त १८ धावांनी हा सामना जिंकला. 
 

Web Title : मुंबई इंडियंस पर जुर्माना; हार्दिक पांड्या, टिम डेविड पर कार्रवाई।

Web Summary : धीमी ओवर गति के लिए हार्दिक पांड्या पर जुर्माना; आरसीबी मैच के दौरान आचार संहिता का उल्लंघन करने पर टिम डेविड पर जुर्माना, मैच फीस का 25% नुकसान। डेविड ने दो बार अंपायर के निर्देशों की अनदेखी की।

Web Title : Mumbai Indians penalized; Hardik Pandya, Tim David face action.

Web Summary : Hardik Pandya fined for slow over rate; Tim David penalized for violating conduct during the RCB match, losing 25% of his match fee. David twice ignored umpire instructions regarding ball changes.