Join us
Daily Top 2Weekly Top 5

MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल

MI vs RCB यांच्यातील लढतीदरम्यान नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 08:01 IST

Open in App

IPL 2026 स्पर्धेतील मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला पराभवाचा दणका दिला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना फिल सॉल्टच्या साथीनं विराट कोहलीनं पहिल्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी रचली. एका बाजूला फिल सॉल्ट आक्रमक फटकेबाजी करत असताना विराट कोहलीनं संयमी खेळी करत अर्धशतक झळकावले. बरोबर ५० धावा झाल्यावर मोठा फटका खेळण्याच्या नादत तो बाद झाला. विकेट गमावल्यावर विराट कोहलीने रागाच्या भरात आपले ग्लोव्हज आणि हेल्मेट फेकल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

नेमकं काय घडलं?

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात २० धावा करताच कोहली या फ्रँचायझी संघाविरुद्ध १००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. खास विक्रम आपल्या नावे केल्यावर कोहलीनं ३७ व्या चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पण पुढच्याच चेंडूवर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर तो फुलटॉस चेंडूवर झेलबाद होऊन परतला. मोठा फटका खेळण्याचा त्याचा डाव फसला आणि सीमारेषेवर सूर्यानं त्याचा अप्रतिम झेल टिपला. विकेट गमावल्यावर विराट निराश झाला. पॅव्हेलियनकडे परतताना त्याने आधी ग्लोव्हज फेकले आणि त्यानंतर हेल्मेटही जमिनीवर आपटले. त्याची ही  रिॲक्शन तो आपल्या खेळीवर असमाधानी असल्याचे दाखवून देणारी होती. 

रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक

विराटसह फिल सॉल्ट आणि रजत पाटीदारची धमाकेदार खेळी

MI विरुद्धच्या सामन्यात RCB च्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. फिल सॉल्टने ३६ चेंडूत ७८ धावा केल्या, तर रजत पाटीदारने २० चेंडूत ५३ धावांची झंझावाती खेळी केली. टिम डेविडनेही १६ चेंडूत ३४ धावा करत संघाच्या धावफलकावर २४० धावा लावल्या. या धावांचा पाठलाग करताना शेरफेन रुदरफोर्ड याने ३१ चेंडूत १ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ७१ धावांची नाबाद खेळी केली. पण MI चा संघ १८ धावांनी कमी पडला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kohli's anger after wicket loss: Helmet and gloves thrown!

Web Summary : Virat Kohli's frustration boiled over after losing his wicket against MI, throwing his gloves and helmet. He scored 50 runs. RCB defeated MI after Salt, Patidar contributed with the bat. Despite Rutherford's efforts, MI fell short.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली