IPL 2026, Mumbai Indians vs Kolkata Knight Riders, 2nd Match : रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने वानखेडेच्या मैदानात विक्रमी विजयासह यंदाच्या हंगामाची दिमाखदार सुरुवात केली. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ बाद २२० धावा करत मुंबई इंडियन्ससमोर २२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाच वेळच्या विजेत्या संघाने आतापर्यंतच्या इतिहात कधीच एवढ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा डाव साधताना १३ वर्षांचा दुष्काळही संपवला.
२०१३ च्या आयपीएल हंगामापासून मुंबई इंडियन्सचा संघाने IPL मध्ये एकदाही सलामीची लढत जिंकली नव्हती. प्रत्येक हंगामात MI च्या चाहत्यांवर पहिला सामना देवाला...असं म्हणायची वेळ आली. पण यंदाच्या हंगामात धमाकेदार विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघाने 'तो' दुष्काळ संपवत १९ व्या पर्वात जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी सज्ज असल्याचा संदेशच दिला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने दिलेल्या विक्रमी २२१ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन जोडीनं कोलकाताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पॉवर प्लेमध्ये या जोडीनं ८० धावा कुटल्या. हाच धमाका पुढेही कायम ठेवत दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी रचली. रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सने पहिली विकेट गमावली. त्याने ३८ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७८ धावांची खेळी केली. रायन रिकल्टन याने ४३ चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार यादवनं विक्रमी विजयात ८ चेंडूत १६ धावांचे तर तिलक वर्मानं १४ चेंडूत २० धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्या आण नमन धीरनं अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार मारत मुंबई इंडियन्सला ६ विकेट्सनी विजय निश्चित केला. हार्दिक पांड्याने ११ चेंडूत नाबाद १८ धावांची खेळी केली.
Web Summary : Mumbai Indians started IPL 2026 with a record win against KKR, chasing down 221 thanks to explosive batting from Rohit Sharma and Ryan Rickelton. This victory also ended MI's 13-year losing streak in opening matches, signaling their championship ambition.
Web Summary : मुंबई इंडियंस ने रोहित शर्मा और रयान रिकल्टन की तूफानी बल्लेबाजी से केकेआर के खिलाफ रिकॉर्ड जीत के साथ आईपीएल 2026 की शुरुआत की। इस जीत ने MI के शुरुआती मैचों में 13 साल की हार का सिलसिला भी तोड़ दिया, जिससे उनकी चैम्पियनशिप की महत्वाकांक्षा का संकेत मिलता है।