११ व्या वर्षी घर सोडलं! Angkrish Raghuvanshi च्या मुंबई ते कोलकाता प्रवासातील प्रेरणादायी गोष्ट

 क्रिकेटच्या पंढरीत नायरच्या सानिध्यात आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:57 IST2026-03-30T13:40:06+5:302026-03-30T13:57:04+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 MI vs KKR Angkrish Raghuvanshi’s Inspiring Journey from Mumbai to Kolkata With Lesser Known Facts Of This Youngest Cricketer | ११ व्या वर्षी घर सोडलं! Angkrish Raghuvanshi च्या मुंबई ते कोलकाता प्रवासातील प्रेरणादायी गोष्ट

११ व्या वर्षी घर सोडलं! Angkrish Raghuvanshi च्या मुंबई ते कोलकाता प्रवासातील प्रेरणादायी गोष्ट

IPL 2026 MI vs KKR Angkrish Raghuvanshi : भारतात क्रिकेट केवळ खेळ नाही, तर तो एक धर्म मानला जातो. लाखो तरुण क्रिकेटर होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र तपस्या करताना दिसतात. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या प्रचंड गर्दीत काही चेहरे आपली वेगळी छाप सोडतात. अंगकृष रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) हा युवा क्रिकेटर त्यापैकीच एक आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

११ व्या वर्षी घर सोडलं;  मुंबईकर क्रिकेटरचा KKR संघाकडून धमाका

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) कडून मिळालेल्या संधीचं सोनं करत अवघ्या २१ वर्षांच्या या युवा क्रिकेटरनं अल्पावधीतच आपल्यातील धमक दाखवून दिली आहे. मात्र, त्याचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. वयाच्या ११ व्या वर्षी दिल्लीतील घर सोडून त्याने भारतीय क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईची वाट धरली. आज अवघ्या २१ व्या वर्षी तो स्टार खेळाडूंच्या गर्दीत चमकणारा हिरा ठरताना दिसतोय. चला, जाणून घेऊया दिल्लीचा क्रिकेटरच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी
 
वानखेडेवर MI ची मॅच पाहायला नसायचे पैसे, आज त्याच संघाविरुद्ध कडक फिफ्टी

IPL २०२६ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात केली. वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात कोलकाताच्या संघाकडून दोन मुंबईकरांचा जलवा पाहायला मिळाला. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाशिवाय २१ वर्षीय युवा क्रिकेटर अंगकृष रघुवंशी याने मुंबईतील वानखेडेवर आपल्या फलंदाजीचा खास नजराणा पेश केला. कधीकाळी याच मैदानावर सामने पाहण्यासाठी तिकीट घेण्याइतके पैसेही नसलेल्या या पठ्ठ्यानं  MI विरुद्ध दमदार अर्धशतक झळकावलं. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर खेळलेल्या स्वीप शॉटसह त्याच्या बॅटमधून काही अप्रतिम फटके पाहायला मिळाले. त्याची ही खेळी आगामी काळात आणखी एक हिरो क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी तयार असल्याचा ट्रेलरच होती.

 क्रिकेटच्या पंढरीत नायरच्या सानिध्यात आला अन्...

अंगक्रिश रघुवंशी हा भारतीय क्रिकेटमधील चर्चित चेहऱ्यांपैकी एक आहे. २०२४ मध्ये कोलकाताच्या संघाकडून पदार्पण करणाऱ्या या युवा क्रिकेटरनं बेधडक फलंदाजीसह दबावात धमाका करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या या क्रिकेटरनं गल्ली क्रिकेटमधील टेनिस बॉलवर आपल्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात केली. क्रिकेटर होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी ११ व्या वर्षी तो घर सोडून क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत आला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळताना त्याने आपल्यातील धमक दाखवली. या क्रिकेटरला घडवण्यात माजी क्रिकेटर आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील कोचिंग स्टाफमधील अभिषेक नायरचाही मोठा वाटा आहे. अंगक्रिश रघुवंशीला तंत्रशुद्ध फलंदाजीसह मानसिकदृष्ट्या कणखरतेचे धडे त्यांनीच दिले आहेत.

मल्टी-टॅलेंटेड अ‍ॅथलीट  

रघुवंशी फक्त प्रतिभावंत क्रिकेटपटू नव्हे तर एक मल्टी-टॅलेंटेड अ‍ॅथलीट आहे. शाळेत असताना तो स्प्रिंटिंग आणि लाँग जंपमध्येही पारंगत होता. यामुळे त्याची फिटनेस आणि फील्डिंग खूप कमालीची आहे. याशिवाय तो गिटार वाजवण्याचा छंदही जोपासतो. 

Web Title : अंगकृष रघुवंशी की प्रेरणादायक यात्रा: 11 साल की उम्र में घर छोड़ा, क्रिकेट में सफलता।

Web Summary : 21 वर्षीय क्रिकेटर अंगकृष रघुवंशी ने 11 साल की उम्र में मुंबई में अपना सपना पूरा करने के लिए घर छोड़ दिया। केकेआर के लिए खेलते हुए, उन्होंने वानखेड़े में एमआई के खिलाफ अर्धशतक के साथ अपनी प्रतिभा का प्रदर्शन किया, एक ऐसा मैदान जिसमें कभी प्रवेश करने का खर्च नहीं उठा सकते थे। अभिषेक नायर द्वारा प्रशिक्षित, रघुवंशी एक प्रतिभाशाली एथलीट और संगीतकार भी हैं।

Web Title : Angkrish Raghuvanshi's inspiring journey: Leaving home at 11 to cricket success.

Web Summary : Angkrish Raghuvanshi, a 21-year-old cricketer, left home at 11 to pursue his dream in Mumbai. Playing for KKR, he showcased his talent with a fifty against MI at Wankhede, a ground he once couldn't afford to enter. Mentored by Abhishek Nayar, Raghuvanshi is also a talented athlete and musician.