Join us
Daily Top 2Weekly Top 5

किंगच्या विकेटसाठी काय योजना होती? प्रिन्स म्हणाला; मला खुद्द विराट भैय्यानेच दिला होता सल्ला (VIDEO)

प्रिन्सनं परफेक्ट सेटअपसह घेतली किंग कोहलीची विकेट

By सुशांत जाधव | Updated: May 8, 2026 11:48 IST

Open in App

Prince Yadav Uses Virat Kohli’s Own Advice Against Him : लखनौच्या मैदानात धावांचा बचाव करताना लखनौच्या ताफ्यातील भारतीय अनकॅप्ड जलदगती गोलंदाज प्रिन्स यादवनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली. आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने विराट कोहलीला एका अप्रतिम इनस्विंग चेंडूवर क्लीन बोल्ड केले. पण तुम्हाला माहितीये का? ही 'विराट' विकेट खात्यात जमा करण्यासाठी या प्रतिभावंत गोलंदाजाला विराट कोहलीने दिलेला सल्लाच कामी आला. सामन्यानंतर प्रिन्स यादवनं यामागची खास स्टोरी सांगितले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

प्रिन्सनं परफेक्ट सेटअपसह घेतली किंग कोहलीची विकेट
 

विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी प्रिन्स यादवनं कमालीचा सेटअप केला होता. RCB च्या स्टार बॅटरसाठी एका स्लिपसह आउट स्विंग चेंडूने प्रिन्स यादवनं आपल्या षटकाची सुरुवात केली. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक असल्यामुळे विराट कोहलीने इनस्विंगचा विचारच केला नाही.पण प्रिन्स यादवने दुसऱ्याच चेंडूवर अचूक टप्पा आणि वेगासह अप्रतिम इनस्विंगवर  त्याला चकवा दिला. गोलंदाजीतील व्हेरिएशनचा हुशारीनं वापर करत प्रिन्सनं किंग कोहलीला शून्यावर माघारी धाडले.  

प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)

कोहलीचा सल्ला कामी आला, किंगसमोर प्रिन्स भारी ठरला


 

सामन्यानंतर प्रिन्स यादवला विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी नेमकी कोणती योजना होती, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर युवा गोलंदाजाने रंजक खुलासा करत सांगितले की, खुद्द किंग कोहलीने दिलेला सल्ला अत्यंत उपयुक्त ठरला. तो म्हणाला की, मागील सामन्यानंतर विराट भैय्यासोबत बराच वेळ चर्चा केली होती.  चेंडूला स्विंग मिळत असेल तर अनावश्यकपणे टप्पा न बदलता अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यावर भर दे, असा सल्ला खुद्द विराट भैय्याने दिला. मी तेच केलं. असे प्रिन्स यादवनं म्हटले आहे. 

चेज मास्टरला खातेही उघडता आले नाही

लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने मिचेल मार्शच्या शतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धची लढाई दोनशेपारची केली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे एक षटक कपात करण्यात आल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना LSG च्या संघाने ३ बाद २०९ धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार, RCB ला २१३ धावांचे लक्ष्य देण्यात आले. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. प्रिन्स यादवने त्याच्यासह ३ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.


 

English
हिंदी सारांश
Web Title : Virat Kohli's Advice Helped Prince Yadav Dismiss Him: Story Revealed

Web Summary : Prince Yadav dismissed Virat Kohli using his own advice. Kohli had advised Yadav to focus on accurate bowling if the ball was swinging, which Yadav implemented to take Kohli's wicket in the match between LSG and RCB.
टॅग्स :आयपीएल २०२६लखनौ सुपर जायंट्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली