LSG vs DC : २६ धावांत ४ विकेट्स! मग समीर-स्टब्स जोडी जमली अन् लखनौच्या घरच्या मैदानात दिल्लीकरांनी मारली बाजी

संघ संकटात असताना चमकली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 23:39 IST2026-04-01T23:19:30+5:302026-04-01T23:39:57+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 LSG vs DC Sameer Rizvi Tristan Stubbs Power Delhi Capitals Won By 6 Wkts vs Lucknow Super Giants | LSG vs DC : २६ धावांत ४ विकेट्स! मग समीर-स्टब्स जोडी जमली अन् लखनौच्या घरच्या मैदानात दिल्लीकरांनी मारली बाजी

LSG vs DC : २६ धावांत ४ विकेट्स! मग समीर-स्टब्स जोडी जमली अन् लखनौच्या घरच्या मैदानात दिल्लीकरांनी मारली बाजी

Lucknow Super Giants vs Delhi Capitals, 5th Match : समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानात ६ विकेट्सने पराभूत करत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौचा संघ १४१ धावांवर आटोपला. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने २६ धावांवर आघाडीच्या ४ विकेट्स गमावल्या होत्या. हा सामना लखनौच्या बाजूनं झुकला असताना समीर-स्टब्स जोडी जमली. या दोघांनी नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर सामना फिरवला.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्ली कॅपिटल्सची खराब सुरुवात, पॉवर प्लेमध्ये २६ धावांत गमावल्या ४ विकेट्स

१४२ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून  लोकेश राहुल आणि पथुम निसंका यांनी डावाची सुरुवात केली. मोहम्मद शमीनं पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला चालते केले. प्रिन्स यादवनं पथुम निसंकाला अवघ्या एका धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. २१ धावांवर दुसरी विकेट पडल्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने समीर रिझवीला इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. तौ मैदानात आल्यावर नितिश राणा १७ चेंडूत १५ धावा तर अक्षर पटेल खातेही न उघडता तंबूत परतला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची अवस्था ४ बाद २६ धावा अशी बिकट झाली होती. हा सामना लखनौ सुपर जाएंट्सच्या बाजूनं झुकल्याचे चित्र निर्माण झाले.

मग समीर-स्टब्स जोडी जमली अन्...

संघ अडचणीत असताना दिल्लीच्या ताफ्यातील समीर आणि स्टब्स या युवा बॅटर्संनी संयमी खेळी करत कोणतीही जोखीम न घेता डाव सावरण्याची रणनिती आखली. या जोडीनं अक्षरश: LSG च्या संघाचे खांदे पाडले.  पाचव्या विकेटसाठी ७६ चेंडूत ११९ धावांची भागीदारी रचत दोघांनीच ६ विकेट्स आणि १७ चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला.


 

Web Title : रिज़वी-स्टब्स की साझेदारी से दिल्ली ने लखनऊ में जीत हासिल की।

Web Summary : रिज़वी और स्टब्स की नाबाद साझेदारी की बदौलत दिल्ली कैपिटल्स ने लखनऊ सुपर जायंट्स को 6 विकेट से हराया। लखनऊ 141 पर सिमट गया, और दिल्ली ने शुरुआती 4 विकेट खोने के बाद लक्ष्य का पीछा किया।

Web Title : Rizvi-Stubbs partnership secures Delhi's victory in Lucknow after early collapse.

Web Summary : Delhi Capitals recovered from a shaky start thanks to Rizvi and Stubbs' unbeaten partnership, defeating Lucknow Super Giants by 6 wickets in their home ground. Lucknow collapsed to 141, and Delhi chased it down after losing 4 early wickets.