Lucknow Super Giants vs Delhi Capitals, 5th Match : रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्स संघ भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर रंगणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लढतीसह IPL २०२६ स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. दोन्ही संघ गत हंगामात प्लेऑफ्सपर्यंतही मजल मारु शकले नव्हते. पहिल्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेले दोन्ही संघ विजयी सलामी देण्यासाठी प्रयत्नशील असतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रिषभ पंतसह LSG च्या ताफ्यातील या खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण असेल हंगाम
IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या रिषभ पंतला गत हंगामात ना या सामन्यात लखनौच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज मयंक यादव आणि मोहम्मद शमीच्या कामगिरीवर नजरा असतील. २३ वर्षीय मयंक यादव IPL च्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. पण तो दुखापतीतून सावरत मैदानात उतरत आहे. दुसरीकडे मोहम्मद शमी ट्रेड विंडीच्या माध्यमातून नव्या संघाकडून आपल्यातील धमक दाखवून टीम इंडिच्या निवडकर्त्यांना आपल्यातील दम दाखवण्यासाठी प्रयत्नशील असेल. या दोघांशिवाय अष्टैपलू अर्जुन तेंडुलकरला LSG संघाकडून किती संधी मिळणार तेही पाहण्याजोगे असेल. एडन मार्करम, मिचेल मार्श आणि निकोलस पूरन हे परदेशी खेळाडू LSG ची फलंदाजीतील ताकद आहेत.
श्रेयस अय्यरला १२ लाखांचा मोठा दणका! IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यानंतर BCCIची कारवाई
दिल्ली कॅपिटल्सचा काय असेल गेम प्लॅन?
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सकडे लखनौसारखी मजबूत टॉप ऑर्डर नाही. लोकेश राहुल यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात करेल, हे निश्चित आहे. त्याच्यासोबत डावाला सुरुवात करण्यासाठी दिल्लीच्या संघाकडे पथुम निसंका, बेन डकेट आणि पृथ्वी शॉ हे पर्याय आहेत. अक्षर पटेल यापैकी कुणाला संधी देणार तेही पाहण्याजोगे असेल. दिल्लीचा संघ मिचेल स्टार्कच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणार आहे. तो खांदा आणि कोपराच्या दुखापतीतून सावरत आहे. त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सच्या जलदगती गोलंदाजाची मदार ही लुंगी एनिग्डीवर असेल. टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. याशिवाय फिरकी गोलंदाजामध्ये अक्षर पटेलसह कुलदीप यादव हे संघाची ताकद ठरु शकतील.
कसा आहे दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड?
आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत ७ सामने खेळवण्यात आले आहेत. यात दिल्ली कॅपिटल्स ४-३ अशी आघाडी घेतली आहे. घरच्या मैदानात लखनौचा संघ बरोबरीचा डाव साधण्यासाठी जोर लावताना दिसेल.
कुठे आणि कधी रंगणार LSG vs DC यांच्यातील सामना?
लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्याती सामना बुधवारी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळवला जाईल.
लखनौ संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मिचेल मार्श, एडन मार्करम, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), आयुष बदोनी, अब्दुल समद, अक्षत रघुवंशी, शाहबाज अहमद, मोहम्मद शमी, मयंक यादव, दिग्वेश राठी
दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन
केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसंका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), डेविड मिलर, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, औकिब नबी, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव
भारतामध्ये कुठे पाहता येईल सामना ?
जिओहॉटस्टार ॲप /वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल्सवर थेट प्रसारण