कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानातील कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णित राहिला. आउटफिल्डवरील ओलाव्यामुळे प्रत्येकी ५-५ षटकांचा खेळही शक्य नसल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना फिन अॅलन ६ (७) आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील सर्वात महागडा गडी कॅमरून ग्रीन ४ (२) स्वस्तात माघारी परतले. केकेआरच्या धावफलकावर ३.४ षटकात २ बाद २५ धावा असताना पावसामुळे खेळ थांबला. कट ऑफ टाइमनुसार, निकालासाठी प्रत्येकी-पाच-पाच षटकांचा सामना घेणंही शक्य नसल्याने शेवटी हा सामना रद्द झाल्याचे घोषित करत दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. पावसाच्या बॅटिंगच्या जोरावर मिळालेल्या एका गुणासह तिसऱ्या अनिर्णित सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने यंदाच्या हंगामात खाते उघडले. दुसरीकडे पंजाबच्या संघाला दोन सामन्यातील दमदार कामगिरीनंतर एका गुणावर समाधान मानावे लागले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अजिंक्य रहाणेचा निर्णय पुन्हा चुकला, पावसाच्या बॅटिंगमुळे तो वाचला, नाहीतर...
अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या वातवणामुळे सामन्यात गोलंदाजांना मदत मिळेल, अशी परिस्थितीत असताना त्याने पहिल्यांदा फलंदाजी निवडली. जर प्रत्येकी ५-५ षटकांचा सामना झाला असताना तर कोलकाताच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय महागात पडला असता. पण पावसाच्या बॅटिंगमुळे शेवटी सामना अनिर्णित राहिला अन् निर्णय चुकीचा निर्णय घेऊन फसलेला अजिंक्य रहाणे वाचला. एवढेच नाही तर कोलकाता नाईट रायडर्सने एका गुणासह यंदाच्या हंगामातील खातेही उघडले.
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
याआधी अजिंक्य रहाणेनं निर्णय चुकल्याची दिली होती कबुली
सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना केल्यावर घरच्या मैदानात सनरायझर्स हैदराबादनेही कोलकाता नाईट रायडर्सला घरच्या मैदानात दणका दिला होता. या सामन्यात नाणेफेक जिंकून अजिंक्य रहाणे याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरल्यावर खेळपट्टीचा अंदाज चुकला असे म्हणत अजिंक्य रहाणेनं आपली चूक मान्य केली होती. सातत्यपूर्ण खराब कामगिरीमुळे कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना पुन्हा एकदा त्याने चुकीचा निर्णय घेतला. पण पावसामुळे सामना अनिर्णित राहिल्यामुळे तो वाचला. पुढच्या सामन्यात तरी तो मॅच आधीच्या या चुका टाळणार का? ते पाहण्याजोगे असेल.