मुकुल चौधरीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला ३ विकेट्स राखून पराभूत केले. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने ४ विकेट्सच्या मोबदल्यात १८१ धावा करत लखनौच्या संघासमोर १८२ धावांचे टार्गेट सेट केले होते. अखेरच्या दोन चेंडूत ७ धावांची गरज असताना मुकुल चौधरी याने वैभव अरोराच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारत सामना बरोबरीत आणला. अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने संघाचा विजय निश्चित केला. त्याच्याशिवाय या सामन्यात आयुष बडोनी यानेही उर्धशतकी खेळी साकारली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखेरच्या षटकातील थरार!
कोलकाताच्या संघाने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग करताना अखेरच्या २ षटकात लखनौसुपर जाएंट्सच्या संघाला ३ विकेट्स हातात असताना ४० धावांची गरज होती. १९ व्या षटकात त्याने कॅमरुन ग्रीनच्या षटकात दोन षटकारांसह एका चौकाराच्या मदतीने १६ धावा कुटल्या. वैभव सूर्यवंशी घेऊन आलेल्या अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर आवेश खान याने त्याला एकेरी धाव काढत स्ट्राईक दिले. या षटकात दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारत मुकुल चौधरी याने संघाला विजयाच्या आणखी जवळ नेले. या षटकारानंतर दमदार कमबॅक करत वैभव अरोरानं दोन निर्धाव चेंडू टाकले. पण दबावात पाचव्या चेंडूवर षटकार मारत त्याने कोलकाताच्या बाजूनं झुकलेला सामना लखनौच्या बाजूनं वळवला. त्याने २७ चेंडूत २ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावांची खेळी साकारली. याशिवाय आयुष बडोनी याने ३४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या.
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
गोलंदाजीत दमदार सुरुवात करून KKR वर आली मॅच गमावण्याची वेळ
धावांचा बचाव करताना कोलाकाताच्या संघाच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. १०४ धावांवर LSG चा अर्धा संघ तंबूत परतला होता. स्टार फलंदाज स्वस्तात आटोपल्यावर कोलकाताचा संघ बाजी मारेल, असे चित्र निर्माण झाले. पण आयुष बडोनीच्या अर्धशतकानंतर मुकुल चौधरीची बॅट तळपली अन् कोलकाताच्या संघाने हातात आलेला सामना गमावला. वैभव अरोरा आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी २-२ तर सुनील नरेन, कार्तिक त्यागी आणि कॅमरुन ग्रीन यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
अर्धशतकाशिवाय संपला होता KKR चा डाव, पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम
नाणेफेकीचा कौल गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना फिन ॲलनच्या रुपात अवघ्या १५ धावांवर पहिली विकेट गमावल्यावर अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी या जोडीनं कोलकाताचा डाव सावरला. पण चांगली सुरुवात मिळाल्यावर अर्धशतकाकडे वाटलाच करत असताना दोघांनी विकेट गमावली. कर्णधार अजिंक्य रहाणे याने २४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली. रघुवंशीनं ३३ चेंडूत ४५ धावा केल्या. अखेरच्या षटकात कॅमरून ग्रीन ३२ (२४) आणि रोमव्हन पॉवेल ३९ (२४) यांनी उपयुक्त खेळी करत पाचव्या विकेटसाठी ४० चेंडूत ७० धावांची खेळी करत निर्धारित २० षटकात ४ विकट्सच्या मोबदल्यात १८१ धावा केल्या. LSG कडून प्रिन्स यादव. एम सिद्धार्थ, दिग्वेश राठी आणि आवेश खान यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली. या धावांचा बचाव करण्यात KKR चा संघ अपयशी ठरला. या सामन्यात पराभवासह केकेआरची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम राहिली.