बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार

रिषभ पंतच्या रुपातत LSG च्या संघाला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 23:08 IST2026-04-09T23:01:29+5:302026-04-09T23:08:18+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 KKR vs LSG Cameron Green With His Golden Arms Gets The Crucial Wicket Of Rishabh Pant Fitst Over 2nd Ball | बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार

बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार

आयपीएल २०२६ च्या हंगामातील आपल्या चौथ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि कर्णधार अजिंक्य रहाणेला मोठा दिलासा मिळाला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात संघातील सर्वात महागडा ऑलराउंडर कॅमरून ग्रीन गोलंदाजी करताना दिसला. एवढेच नाही तर मिनी लिलावात तब्बल २५.२० कोटी मोजलेल्या या ऑलराउंडरनं आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर लखनौ सुपर जाएंट्सचा कर्णधार रिषभ पंतच्या रुपात यंदाच्या हंगामातील आपली पहिली विकेटही घेतली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कॅमरून ग्रीनची पहिली ओव्हर, एक डझन धावा अन् एक महत्त्वपूर्ण विकेट

ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर पहिल्या तीन सामन्यात फलंदाजीत लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नव्हता. त्यात गोलंदाजी करत नसल्यामुळे KKR च्या संघाने त्याला तब्बल २५ कोटी का मोजले? असा प्रश्नही उपस्थितीत करण्यात आला. कर्णधार अजिंक्य रहाणेनं त्याला गोलंदाजी न देण्याच्या प्रश्नावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडे बोट दाखवत केलेले वक्तव्यही चांगलेच गाजले. त्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्टीकरणही दिले. दुखापतीतून सावरत असल्यामुळे तो गोलंदाजी करत नाही, पण लवकरच तो ही भूमिकाही बजावताना दिसेल, असे त्यांनी म्हटले होते. अखेर LSG विरुद्ध तो फुलटाईम ड्युटीसाठी तयार असल्याचे दिसून आले. पहिल्यांदा फलंदाजीत नाबाद ३२ धावांची उपयुक्त खेळी केल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करताना त्याने महत्त्वपूर्ण विकेट घेत पूर्णवेळ जबाबदारी बजावण्यास तयार असल्याचे संकेत दिले. पहिल्या षटकात १२ धावा खर्च करून त्याने १ महत्त्वपूर्ण विकेट घेतली. 

KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)

रिषभ पंतच्या रुपातत LSG च्या संघाला मोठा धक्का

मिचेल मार्श १५ (११) आणि ए़डन मार्करम २२ (१५) स्वस्तात माघारी फिरल्यावर संघाची जबाबदारी रिषभ पंतच्या खांद्यावर पडली. पण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी करून संघाला पहिला विजय मिळवून देणारा पंत कॅमरून ग्रीन समोर अपयशी ठरला. ९ चेंडूत एका चौकारासह तो फक्त १० धावा करून तंबूत परतला. 

Web Title : ग्रीन को हरी झंडी! ऑलराउंडर ने गेंदबाजी की, पंत का विकेट लिया

Web Summary : केकेआर के महंगे ऑलराउंडर कैमरून ग्रीन ने आखिरकार गेंदबाजी की और अपने पहले ओवर में ऋषभ पंत को आउट किया। बल्ले से धीमी शुरुआत के बाद, ग्रीन की गेंदबाजी की शुरुआत कोलकाता के लिए एक बड़ा बढ़ावा है। उन्होंने नाबाद 32 रन भी बनाए। उनके पहले ओवर में 12 रन बने और एक महत्वपूर्ण विकेट मिला।

Web Title : Green Light for Green! All-rounder Bowls, Takes Pant's Wicket

Web Summary : Cameron Green, KKR's expensive all-rounder, finally bowled, dismissing Rishabh Pant in his first over. After a slow start with the bat, Green's bowling debut provides a major boost for Kolkata. He also scored unbeaten 32 runs. His first over yielded 12 runs and a crucial wicket.