तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल

मुकुल चौधरीसंदर्भात नेमकं काय म्हणाला होतो अर्जुन तेंडुलकर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 10:35 IST2026-04-10T10:21:25+5:302026-04-10T10:35:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 KKR vs LSG Arjun Tendulkar's Game Knowledge He Said Mukul Choudhary Player To Watch Out For This Season From LSG Viral Video | तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल

तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Arjun Tendulkar About  Mukul Choudhary Player To Watch Out For This Season :  आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील रंगतदार सामन्यात मुकुल चौधरीच्या रुपात नव्या हिरोनं सुपर हिट ट्रेलर रिलीज केला. लखनौच्या संघाकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुकुलनं वादळी खेळी करत हातून निसटलेल्या सामन्यात LSG च्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. पहिल्या दोन सामन्यात एकही षटकार न मारणाऱ्या २१ वर्षीय बॅटरनं ७ गगनचुंबी षटकार मारले. IPL मधील त्याच्या वादळी खेळीनंतर नव्या संघाकडून पदार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मुकुल चौधरीमध्ये षटकारांच्या आतषबाजीसह IPL स्पर्धा गाजवण्याची क्षमता आहे, असे अर्जुन तेंडुलकर एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मुकुल चौधरीसंदर्भात नेमकं काय म्हणाला होतो अर्जुन तेंडुलकर?

शुभंकर मिश्रा यांच्या खास पॉडकास्ट शोमध्ये अर्जुन तेंडुलकर अनेक विषयावर गप्पा गोष्टी करताना दिसला होता. यावेळी नेट्स प्रॅक्टिस दरम्यान गोलंदाजी करताना LSG च्या संघातील कोणत्या खेळाडूंमध्ये धमक दिसली? कोण आगामी दोन वर्षांत लखनौच्या संघाकडून IPL स्पर्धा गाजवेल, असे वाटते? असा प्रश्न अर्जुन तेंडुलकरला विचारण्यात आला होता. यावर अर्जुन तेंडुलकरनं मुकुल चौधरीचं नाव घेतल्याचे पाहायला मिळाले होते. तो म्हणाला होता की, मुकुल चौधरीचे षटकार पाहून प्रभावित झालो. तो मैदानातील कानाकोपऱ्यात उत्तुंग फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा फलंदाज आहे. प्रॅक्टिस मॅचमध्ये त्याने स्क्वेअर लेग, पॉइंटच्या आणि अपर कटसह षटकार मारल्याचा उल्लेख करत यंदाच्या हंगामात मुकुल चौधरी लक्षवेधी ठरेल, असे अर्जुन तेंडुलकरने म्हटले होते. मुकुल चौधरीच्या धमाकेदार शोनंतर अर्जुन तेंडुलकरची या युवा स्टार संदर्भातील वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.    

KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन...

 मुकुलला व्हायचंय MS धोनीसारख फिनिशर 


 

मुकुल चौधरी यानेही शुभंकर मिश्रा यांच्याशी खास गप्पा गोष्टी करताना महेंद्रसिंह  धोनीसारखं फिनिशर होण्याचं स्वप्न असल्याची भावना व्यक्त केली होती. धोनी हा सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळत मॅच संपवतो. याच गोष्टी अनुकरण करतो, असे  तो म्हणाला होता. अगदी त्याच तोऱ्यात त्याने ईडन गार्डन्सच्या मैदानातील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात लखनौला एकहाती विजय मिळवून देत आपल्यातील फिनिशरची धमक दाखवून दिली. 
 

Web Title : मुकुल चौधरी की तूफानी पारी: अर्जुन तेंदुलकर का पुराना वीडियो वायरल!

Web Summary : मुकुल चौधरी की मैच जिताऊ आईपीएल पारी के बाद अर्जुन तेंदुलकर की भविष्यवाणी फिर से सामने आई है। तेंदुलकर ने चौधरी की शक्तिशाली हिटिंग और चमकने की क्षमता की प्रशंसा की, यहां तक कि अभ्यास मैचों के दौरान मैदान के चारों ओर छक्के मारने की उनकी क्षमता पर भी प्रकाश डाला। चौधरी का लक्ष्य एमएस धोनी की तरह फिनिशर बनना है।

Web Title : Mukul Choudhary's explosive innings: Arjun Tendulkar's old video goes viral!

Web Summary : Mukul Choudhary's match-winning IPL knock has made Arjun Tendulkar's earlier prediction about him resurface. Tendulkar praised Choudhary's powerful hitting and potential to shine, even highlighting his ability to hit sixes all around the ground during practice matches. Choudhary aims to emulate MS Dhoni as a finisher.