KKR 'हलवा बदाम' टीम! MI चा राजा रोहित शर्मा त्यांचा बाजा वाजवणार? माजी दिग्गज म्हणाला...

रोहित शर्माही त्या खेळाडूंपैकी एक आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 17:25 IST2026-03-29T17:06:09+5:302026-03-29T17:25:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 K Srikanth Statement On Rohit Sharma Against KKR | KKR 'हलवा बदाम' टीम! MI चा राजा रोहित शर्मा त्यांचा बाजा वाजवणार? माजी दिग्गज म्हणाला...

KKR 'हलवा बदाम' टीम! MI चा राजा रोहित शर्मा त्यांचा बाजा वाजवणार? माजी दिग्गज म्हणाला...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडेत सक्रिय असलेला रोहित शर्मामुंबई इंडियन्सच्या संघाकडून पुन्हा एकदा टी-२० खेळताना दिसणार आहे. यंदाचा हंगाम रोहित शर्मासाठी खास आहे. कारण आगामी वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने फिट अँण्ड हिट शो दाखवून देण्याचे चॅलेंज त्याच्यासमोर असेल. २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपसाठी BCCI नं संभाव्य २० खेळाडूंची निवड केली असून IPL दरम्यान निवडकर्ते त्या खेळाडूंवर लक्ष ठेवून असणार आहेत. रोहित शर्माही त्या खेळाडूंपैकी एक आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कमालीच्या फिटनेससह हिटमॅन रुबाब दाखवण्यासाठी सज्ज

रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. नेतृत्वाची खास छाप सोडणारा हिटमॅन मागील काही हंगामात लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला होता. पण आता तो कमालीच्या फिटनेससह हिटमॅन आपला रुबाब दाखवून देण्यासाठी तयार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याआधी भारताच्या माजी दिग्गजाने रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्सच्या संघावर तुटून पडेल, अशी भविष्यवाणी केली आहे. कोण आहे तो दिग्गज आणि मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधारासंदर्भात त्याने नेमकं काय म्हटल आहे जाणून घेऊयात सविस्तर...

दोन, तीन नाही IPLमधील तब्बल ९ संघांकडून खेळलाय हा फलंदाज, रचला खास विक्रम, कोण आहे तो?
 
माजी दिग्गजाचं मोठं वक्तव्य

मुंबई इंडियन्स २९ मार्चला कोलकाता नाईट रायडर्सच्या लढतीनं यंदाच्या हंगामातील मोहिमेची सुरुवात करणार आहे. या सामन्याआधी भारताचे माजी सलामीवीर कृष्णमचारी श्रीकांत यांनी रोहित शर्मा वानखेडवर कोलकाताच्या संघावर भारी पडेल, असे म्हटले आहे. श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवरील खास शोमध्ये म्हटले आहे की, “कोलकाता नाईट रायडर्स रोहित शर्मासाठी हलवा बदाम टीम आहे. अर्थात हा संघ हिटमॅनसाठी अगदी सोपा प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्या गोलंदाजीवर तो सहज वर्चस्व गाजवायचा. कोलकाता संघासमोर रोहित अगदी आरामात धावा करतो. त्यामुळे वानखेडेच्या मैदानात तेच चित्र पुन्हा पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

KKR ची गोलंदाजी कमकूवत

यंदाच्या हंगामात कोलकाताची गोलंदाजी  कमकुवत मानली जात आहे. हर्षित राणा, आकाश दीप यांनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यांच्या अनुपस्थिती गोलंदाजीची धूरा ही सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या दोन मिस्ट्री स्पिनरवर असेल. रोहित समोर त्यांचा निभाव लागेल, असे वाटत नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात KKR विरुद्धच्या सामन्यात रोहितच वादळ घोंगावेल, ही श्रीकांत यांची भविष्यवाणी खरी ठरेल असे वाटते. 

हिटमॅन रोहितचा KKR विरुद्धचा रेकॉर्ड

रोहित शर्माचा कोलकाताविरुद्धचा रेकॉर्ड पाहिला तर श्रीकांत यांचं वक्तव्य योग्य वाटतं. आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध त्याने १२७.८६ च्या स्ट्राइक रेटने १०८३ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध १००० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या मोजक्या फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो.

Web Title : रोहित शर्मा केकेआर के गेंदबाजों पर हावी होने के लिए तैयार: विशेषज्ञ भविष्यवाणी

Web Summary : दिग्गज कृष्णमाचारी श्रीकांत ने भविष्यवाणी की है कि रोहित शर्मा कोलकाता नाइट राइडर्स के खिलाफ उत्कृष्ट प्रदर्शन करेंगे, उन्होंने केकेआर की कमजोर गेंदबाजी और शर्मा के खिलाफ उनके मजबूत रिकॉर्ड का हवाला दिया। उन्हें उम्मीद है कि शर्मा वानखेड़े स्टेडियम में हावी रहेंगे।

Web Title : Rohit Sharma Poised to Dominate KKR Bowlers: Expert Prediction

Web Summary : Veteran Krishnamachari Srikkanth predicts Rohit Sharma will excel against Kolkata Knight Riders, citing their weak bowling lineup and Sharma's strong record against them. He anticipates Sharma will dominate at Wankhede Stadium, continuing his history of scoring heavily against KKR.