आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामातील १३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघासमोर मुंबई इंडियन्सचे बारा वाजले. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघातील सामना प्रत्येकी ११-११ षटकांचा खेळवण्यात आला. एका बाजूला हा सामना जिंकत राजस्थान रॉयल्सच्या संघाने विजयाची हॅटट्रिक साधली. दुसऱ्या बाजूला जगातील सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहच्या नावे लाजिरवाण्या हॅटट्रिकची नोंद झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
८ वर्षांनी पाहायला मिळालं असं चित्र
जसप्रीत बुमराह हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत ८ वर्षांनी त्याच्यावर सलग तीन सामन्यात विकेट लेस राहण्याची वेळ आली. टी-२० क्रिकेटमध्ये चौथ्यांदा तो सलग तीन सामन्यात विकेट घेण्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. राजस्थान रॉयल्स विरुद्ध ३ षटकात त्याने १०.७० च्या इकोनॉमी ३२ धावा खर्च केल्या. बुमराहचा एकंदरीत रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत त्याने २७३ टी २० सामन्यात ६.९२ च्या इकोनॉमीसह ३४५ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये १४८ सामन्यात त्याच्या खात्यात १८३ विकेट्स जमा आहेत.
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
याआधी २०१६ मध्ये IPL मध्ये बुमराहवर आली होती ही वेळ
आयपीएल २०२६ च्या हंगामाआधी २०२६ मध्ये बुमराह सलग तीन सामन्यात विकेट लेस राहिला होता. सनरायझर्स हैदराबाद (४-०-३५-०), आरसीबी (४-०-२८-०) आणि पंजाब (२-०-१३-०) या तीन लढतीत त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. याशिवाय २०१४ च्या हंगामात तो तीन सामन्यात विकेट लेस राहिल्याचा रेकॉर्ड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१७-१८ मध्ये त्याच्यावर अशी वेळ आली होती.
बुमराहची खराब कामगिरीमुळे MI च्या चिंतेत भर आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहकडून मुंबई इंडियन्सला खूप अपेक्षा आहेत. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बुमराहने आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली. पण आयपीएलच्या पहिल्या ती सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला आहे. त्याचा खराब फॉर्म MI चं टेन्शन वाढवणारा आहे. उर्वरित सामन्यात त्याच्यासह MI चा संघ कमबॅक करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
वैभव सूर्यवंशीनं षटकारानं केलं स्वागत
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच समोरासमोर आले. युवा सलामीवीरानं जगातील सर्वोत्तम गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आपल्यातील धमक दाखवून दिली. सामन्यातील ही गोष्टही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Web Summary : Jasprit Bumrah faced a rare setback, going wicketless in three consecutive T20 matches after 8 years. Despite a costly outing against Rajasthan Royals, his overall record remains impressive. This poor performance adds to Mumbai Indians' worries.
Web Summary : जसप्रीत बुमराह को एक दुर्लभ झटका लगा, 8 साल बाद लगातार तीन टी20 मैचों में विकेट नहीं ले पाए। राजस्थान रॉयल्स के खिलाफ महंगा प्रदर्शन के बावजूद, उनका समग्र रिकॉर्ड प्रभावशाली बना हुआ है। इस खराब प्रदर्शन से मुंबई इंडियंस की चिंता बढ़ गई है।