Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये धाकधूक, 'या' दोन मॅचविनर खेळाडूंच्या गैरहजरीनं टेन्शन वाढवलं!

IPL 2026: आयपीएल २०२६ चा बिगुल वाजायला अवघे काही तास उरले असताना, पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक चिंतेची बातमी समोर येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:53 IST

Open in App

आयपीएल २०२ चा बिगुल वाजायला अवघे काही तास उरले असताना, पाच वेळच्या चॅम्पियनमुंबई इंडियन्सच्या गोटातून एक चिंतेची बातमी समोर येत आहे. २९ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई आपला पहिला सामना खेळणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या लढतीपूर्वी संघाचे दोन प्रमुख अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स आणि मिचेल सँटनर अद्याप संघात सामील झालेले नाहीत.

२७ मार्च रोजी मुंबई इंडियन्सचे महत्त्वाचे सराव सत्र पार पडले. यामध्ये स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दाखल झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, विल जॅक्स आणि मिचेल सँटनर यांच्या अनुपस्थितीने व्यवस्थापनाच्या कपाळावर आठ्या आणल्या आहेत. स्फोटक फलंदाजी आणि उपयुक्त ऑफ-स्पिनसाठी ओळखला जाणारा विल जॅक्स मुंबईच्या मधल्या फळीचा कणा आहे. न्यूझीलंडचा हा अनुभवी फिरकीपटू केवळ चपळ क्षेत्ररक्षकच नाही, तर शेवटच्या षटकांत मोठे फटके मारण्यातही माहीर आहे.

हे देखील वाचा: विराट कोहली बनणार आशियाचा नवा क्रिकेट सम्राट; मोठ्या विक्रमापासून फक्त २९ धावा दूर!

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषकातील कडक वेळापत्रकानंतर खेळाडूंना रिकव्हरीसाठी वेळ दिला जात आहे. मिचेल सँटनरने अलीकडेच न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केले होते. या जबाबदारीमुळे आणि प्रवासाच्या थकव्यामुळे त्याला विशेष विश्रांती देण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्या सामन्यापर्यंत संघात सामील होतील आणि संघाच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग असतील अशी अपेक्षा आहे.

हे देखील वाचा: आयपीएलमधील बॅन झालेले ८ स्टार खेळाडू, यादीत ३ भारतीय; कोणावर का झाली कारवाई?

आयपीएल २०२५ मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने दमदार पुनरागमन केले होते. गेल्या हंगामात संघाने प्लेऑफमध्ये धडक मारली होती, मात्र दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सकडून निसटता पराभव स्वीकारावा लागल्याने सहाव्या जेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले होते. यावर्षी मुंबईचा संघ त्या चुका सुधारून मैदानात उतरणार आहे. कोलकाता नाईट रायडर्ससारख्या तगड्या संघाविरुद्ध विजयाने सुरुवात करून विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा मुंबईचा मानस आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Indians anxious as key players' absence raises tension.

Web Summary : Mumbai Indians face anxiety as Will Jacks and Mitchell Santner miss practice before their first IPL match. Workload management keeps them away. Mumbai aims for a strong start against Kolkata Knight Riders after a playoff appearance last season.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्स