Join us
Daily Top 2Weekly Top 5

धोनी किती सामन्यांना मुकणार? दुखापतीबाबत समोर आली CSKच्या फॅन्सची चिंता वाढवणारी माहिती

MS Dhoni, IPL 2026: यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच महेंद्रसिंग धोनी हा दुखापतीमुळे सुरुवातीचे दोन आठवडे खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर आली होती. मात्र आता धोनीला झालेल्या दुखापतीबाबत चेन्नईच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 18:22 IST

Open in App

भारताचा माजी कर्णधार  महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपरकिंग्सची ओळख बनलेला आहे. तसेच त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईने पाचवेळी आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळेच चेन्नईच्या चाहत्यांमध्ये धोनीबाबत प्रचंड क्रेझ दिसून येते. मात्र यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच महेंद्रसिंग धोनी हा दुखापतीमुळे सुरुवातीचे दोन आठवडे खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर आली होती. मात्र आता धोनीला झालेल्या दुखापतीबाबत चेन्नईच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

४४ वर्षीय महेंद्रसिंग धोनी हा दुखापतीमुळे आयपीएलचे सुरुवातीचे दोन आठवडे संघाबाहेर राहणार असल्याच्या वृत्ताला चेन्नई सुपरकिंग्सच्या संघव्यवस्थापनाने दुजोरा दिला होता. मात्र आता धोनीला झालेली दुखापत अधिकच गंभीर असून, तो एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्येच मैदानावर परतू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. याचाच अर्थ यंदाच्या आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्सच्या पहिल्या सहा सामन्यांमध्ये धोनी संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे.

यंदाच्या हंगामामध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा संघ ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुवाहाटी येथे होणाऱ्या सामन्यामधून आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे. दरम्यान, महेंद्रसिंग धोनी हा संघासोबत गुवाहाटी येथे गेलेला नाही, तो आराम करत आहे, असे चेन्नईच्या संघातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. आयपीएलमध्ये खेळत असलेला सर्वात वयस्कर खेळाडू असलेला महेंद्रसिंग धोनी गेल्या काही हंगामांपासून गुडघ्याच्या दुखापतीशी झुंजत आहे. २०२३ च्या आयपीएलनंतर त्याने सर्जरीसुद्धा करून घेतली होती. तसेच या दुखापतीमुळे धोनी फलंदाजीसाठी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर उतरत होता.  

English
हिंदी सारांश
Web Title : Dhoni injury: CSK fans concerned about how many matches he'll miss.

Web Summary : Dhoni's injury may keep him out longer than expected. He might miss CSK's first six IPL matches, returning late April. Concern rises among fans.
टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्सटी-20 क्रिकेट