छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...

IPL 2026, GT Vs DC: अखेरच्या षटकात संघाचा विजय जवळपास निश्चित झालेला असताना डेव्हिड मिलरने केलेली एक छोटीशी चूक दिल्लीला नडली आणि हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला होता. हातातोंडाशी आलेला विजयाचा घास आपल्या चुकीमुळे हिरावला गेल्याने डेव्हिड मिलरसुद्धा हताश झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:55 IST2026-04-09T12:54:43+5:302026-04-09T12:55:41+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026, GT Vs DC: A small mistake and the match in hand was lost, David Miller cried profusely in the dressing room, finally... | छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...

छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...

आयपीएलमध्ये बुधवारी रात्री झालेल्या अत्यंत रोमहर्षक लढतीत गुजरात टायटन्सनेदिल्ली कॅपिटल्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला होता.  अखेरच्या षटकात संघाचा विजय जवळपास निश्चित झालेला असताना डेव्हिड मिलरने केलेली एक छोटीशी चूक दिल्लीला नडली आणि हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. या विजयानंतर दिल्लीच्या पराभवाचं खापर निर्णायक क्षणी डेव्हिड मिलरने केलेल्या चुकीवर फोडलं जात आहे. दरम्यान, हातातोंडाशी आलेला विजयाचा घास आपल्या चुकीमुळे हिरावला गेल्याने डेव्हिड मिलरसुद्धा हताश झाला असून, सामन्यानंतर त्याला अश्रू अनावर झाले.

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या झालेल्या पराभवानंतर डेव्हिड मिलर हा अत्यंत निराश झालेला दिसून आला. दिल्ली कॅपिटल्सने सामन्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावरची हताशा दिसून येत आहे. शेवटच्या ३ चेंडूत ८ धावांची गरज असताना डेव्हिड मिलर हा स्ट्राईकवर आला होता. तसेच त्याने पुढच्याच चेंडूवर प्रसिद्ध कृष्णा याच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत सामना दिल्लीच्या बाजूने झुकवला होता. पण अखेरच्या दोन चेंडूत दोन धावांची गरज असताना मिलरले पाचव्या चेंडूवर फटका खेळल्यानंतरही धाव घेतली नव्हती. जर त्या चेंडूवर मिलरने एक धाव घेतली असती तर सामना किमान टाय झाला असता. तसेच सुपर ओव्हरमध्ये नव्याने खेळण्याची संधी दिल्लीला मिळाली असती. मात्र त्या चेंडूवर एकेरी धाव घेण्याचे टाळल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर मिलरला फटका खेळता आला नाही. तसेच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावत असताना एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात कुलदीप यादव धावबाद झाल्याने दिल्लीला ही लढत अवघ्या एका धावेने गमवावी लागली होती.

त्यामुळे सामन्यानंतर त्या चेंडूवर एक धाव न घेतल्याचा पश्चाताप डेव्हिड मिलरच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. तसेच त्याला अश्रू आवरणेही कठीण झाले होते. दरम्यान, दिल्लीचे प्रशिक्षक हेमांग बदाणी यांनी डेव्हिड मिलरला सावरत त्याची समजूत काढल्याचेही व्हिडीओमधून दिसत आहे.  
 

Web Title : मिलर की चूक से दिल्ली हारी; ड्रेसिंग रूम में फूट-फूटकर रोए।

Web Summary : डेविड मिलर की एक चूक से दिल्ली को गुजरात के खिलाफ हार का सामना करना पड़ा। महत्वपूर्ण छक्का लगाने के बावजूद, एक रन लेने में हिचकिचाहट के कारण टीम बराबरी से चूक गई। पछतावे से भरे मिलर को रोते हुए देखा गया, दिल्ली के कोच ने उन्हें सांत्वना दी।

Web Title : Miller's mistake costs Delhi the match; he weeps in dressing room.

Web Summary : David Miller's costly error led to Delhi's narrow defeat against Gujarat. Despite hitting a crucial six, his hesitation on a single cost the team a tie. Overwhelmed with regret, Miller was seen in tears, consoled by Delhi's coach.