Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅप्टन अक्षर पटेलला मोजावी लागली मोठी किंमत; ‘या’ कारणासाठी BCCI ने केली दंडात्मक कारवाई

दिल्ली कॅपिटल्सची पहिली चूक; कॅप्टनला मोजावी लागली किंमत

By सुशांत जाधव | Updated: May 12, 2026 17:18 IST

Open in App

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर अक्षर पटेल याने दमदार अर्धशतकाच्या जोरावर तगड्या पंजाब किंग्सला पराभवाचा धक्का देत 'जर-तर'च्या समीकरणासह यंदाच्या हंगामातील आव्हान कायम राखले. पण धर्मशाला येथील सामन्यात रणनिती आखताना वेळेचा नियम न पाळल्यामुळे  क्षर पटेलला मोठी किंमत मोजवी लागली. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात निर्धारित वेळेत षटके न टाकल्यामुळे (स्लो ओव्हर रेट) बीसीसीआयने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याला १२ लाखांचा दंड ठोठावला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

दिल्ली कॅपिटल्सची पहिली चूक; कॅप्टनला मोजावी लागली किंमत

IPL कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नव्हती. IPL आचारसंहितेतील कलम २.२२ अंतर्गत हा दिल्ली संघाचा यंदाच्या हंगामातील पहिला गुन्हा असल्यामुळे अक्षर पटेलवर १२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.

PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'

सामन्यात नेमकं काय घडलं?

धर्मशाला येथील सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रियांश आर्यने केलेल्या ५६ धावा आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद ५९ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात २१० धावा करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर २११ धावांचे टार्गेट सेटे केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात परतल्यावर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलन केलेली ५६ धावांची आश्वासक खेळी आणि डेविड मिलरच्या ५१ धावांनी संघाचा डाव सावरला. अखेरच्या षटकात माधव तिवारी आणि आशुतोष शर्मानं आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून देताना १९ व्या षटकातच मॅच संपवली.

 प्लेऑप्समध्ये टिकून असले तरी निभाव लागणं मुश्किल, कारण...

पंजाब किंग्स विरुद्धच्या विजयासह १२ व्या सामन्यात यंदाच्या हंगामातील पाचवा विजय नोंदवला. उर्वरित २ सामने जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा संघ १४ गुणांपर्यंत पोहचू शकतो. अव्वल चारमध्ये पोहचण्यासाठी चौथ्या क्रमांकासाठी १४ गुणांसह दोन किंवा अधिक संघात चुरस निर्माण झाली तरच निव्वळ धावगतीच्या माध्यमातूनं त्यांच्यासाठी एक संधी निर्माण होऊ शकते. याचा अर्थ दिल्ली कॅपिटल्सला शेवटचे दोन सामने जिंकून इतर संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Axar Patel Fined: BCCI Penalizes Delhi Capitals Captain for Slow Over Rate

Web Summary : Axar Patel, Delhi Capitals captain, faced a ₹12 lakh fine from the BCCI due to a slow over rate in the match against Punjab Kings. Despite winning, this first offense under IPL's code of conduct led to the penalty, impacting their playoff chances.
टॅग्स :आयपीएल २०२६पंजाब किंग्सदिल्ली कॅपिटल्सअक्षर पटेल