Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL Record : किंग कोहलीला जमलं नाही ते KL राहुलनं करून दाखवलं! एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला

पण याबाबतीत मात्र कोहलीच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे KL राहुल

By सुशांत जाधव | Updated: May 17, 2026 23:50 IST

Open in App

दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात १९४ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी सलामीवीर लोकेश राहुलनं अर्धशतकी खेळीसह खास विक्रमाला गवसणी घातली.  राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने सर्वाधिक नवव्यांदा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करत त्याने एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडीत काढला.  राजस्थान विरुद्ध किंग कोलीला जमलं नाही ते KL राहुलनं करून दाखवलं. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

किंग कोहलीला जमलं नाही ते KL राहुलनं करुन दाखवलं,  एबीचा विक्रमही मोडला 

राजस्थान रॉयल्स विरुद्ध केएल राहुलनं १९ डावात नवव्यांदा  ५० किवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम नोंदवला आहे. या यादीत शिखर धवन दुसऱ्या स्थानावर असून त्याने २४ डावात ७ वेळा ही कामगिरी केल्याचा रेकॉर्ड आहे. विराट कोहलीनं ३३ डावात ७ वेळा राजस्थान रॉयल्सविरुद्ध फिफ्टी प्लसचा डाव साधला आहे. या यादीत एबी डिव्हिलियर्स KL राहुलच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने २० डावात ८ वेळा ही कामगिरी केली आहे.    

Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

याबाबतीत कोहलीच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे KL राहुल

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अर्धशतकी खेळीसह लोकेश राहुलनं यंदाच्या हंगामात ५०० धावाही पूर्ण केल्या. सलग तिसऱ्यांदा आणि आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत आठव्यांदा त्याने हा डाव साधला. या यादीत विराट कोहली ९ वेळा ही कामगिरीसह अव्वलस्थानी आहे. डेविड वॉर्नरनं ७ हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

सलग सर्वाधिक वेळा ५०० प्लसचा डाव साधण्याचा खास रेकॉर्ड

 आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सलग ६ हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर अव्वलस्थानी आहे. त्याने आपल्या IPL कारकिर्दीत २०१४ ते २०२० या कालावधीत प्रत्येक हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. लोकेश राहुलनं २०१८ ते २०२२ या कालावधीत ५ वेळा हा खास डाव साधला. विराट कोहलीनं  २०२३ ते २०२४ या कालावधीत प्रत्येक हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : IPL Record: KL Rahul surpasses Kohli, breaks AB de Villiers' record!

Web Summary : KL Rahul surpassed Virat Kohli by scoring his ninth 50+ score against Rajasthan Royals. He also broke AB de Villiers' record. Rahul has scored 500+ runs in eight IPL seasons, only behind Kohli's nine.
टॅग्स :आयपीएल २०२६राजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्सलोकेश राहुलएबी डिव्हिलियर्स