Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?

वडिलांचा विरोध, लपून छपून मामानं दिले क्रिकेटचे धडे अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 22:25 IST

Open in App

आयपीएलच्या १९ व्या हंगामात समीर दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील समीर रिझवी हा प्रत्येक सामन्यात चमकताना दिसतोय. गत हंगामात IPL मधील पहिले अर्धशतक झळकवणाऱ्या या अनकॅप्ड भारतीय खेळाडूनं यंदाच्या हंगमातील पहिल्या दोन सामन्यात सलग दोन अर्धशतकासह संघाला सामना जिंकून देणारी निर्णायक खेळी केली. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याची शतकी  संधी हुकली. पण ९० धावांसह त्याने  IPL मध्ये फिफ्टीच्या हॅटट्रिकचा डाव साधला. इम्पॅक्टफुल खेळीच्या जोरावर IPL मध्ये हवा करणाऱ्या क्रिकेटरला घडवण्यात त्याचा मामाचा मोठा वाटा आहे. इथं जाणून घेऊयात त्यामागची खास स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

समीरची मनाला भिडणारा प्रवास

२२ वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज समीर रिझवी हा मेरठ येथील लोहिया या छोट्या गावात एका मध्यम कुटुंबियात जन्मलाय आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने त्याच्यासठी ८ कोटी ४० लाख रुपये इतकी मोठी रक्कम मोजली होती. त्याला ८ सामन्यात संधी मिळाली, पण त्या हंगामात त्याची धमक दिसली नाही. गत हंगामात तो ९५ लाख किंमतीसह दिल्ली कॅपिटल्सचा झाला. या क्रिकेटरला इम्पॅक्टफउल क्रिकेटरच्या रुपात घडवण्यात त्याच्या मामा तन्कीब अख्तर यांचा मोलाचा वाटा आहे. स्वत:च क्रिकेटर होण्यास स्वप्न कोलमडून पडल्यावर त्यांनी आपल्या भाचा समीरला क्रिकेटर करण्याच मनावर घेतलं अन् वयाच्या पाचव्या वर्षीपासून ते समीरला क्रिकेटचे धडे देऊ लागले.  

CSK चा ८.४० कोटींचा ‘हिरा’ आता DC चा 'हिरो'! जाणून घ्या Sameer Rizvi च्या IPL मधील प्रवासाची गोष्ट

दाजीनं मेव्हण्यासाठी घरचे दरवाजे केले बंद, तरीही त्याने ध्यास नाही सोडला 

समीरचे वडील हसीन रिझवी यांचा क्रिकेटला विरोध होता. तू क्रिकेट खेळून काय केलंस? असा टोमाणा मारून त्यांनी मेव्हण्यासाठी आपल्या घरचे दरवाजे बंद केले. पण त्यातही तन्कीब अख्तर  त्यांनी समीरला क्रिकेटर करण्याचा ध्यास जपला. IPL मध्ये समीरला ज्यावेळी कोट्यवधीची बोली लागली त्यावेळी त्याचे वडील आजाराने त्रस्त होते. या कठीण प्रसंगी क्रिकेटमधून मिळालेला पैसा कामी आला. एवढेच नाही रिझवी कुटुंबियांचे घराचे स्वप्नही समीरच्या बहरत्या कारकिर्दीमुळे साकार झाले. समीर IPL मध्ये 'करोडपती' झाल्यावर एका मुलाखतीत म्हणाला होता की, "१४ वर्षांत मी आणि मामा १४ दिवसही एकमेकांपासून दूर राहिलो नसेल." 

मामाची कृपा आज भाचा गाजवतोय आयपीएलचं मैदान

मामा तन्कीब अख्तर यांनी आपल्या भाचा समीर याच्यातील क्षमता ओळखून त्याच्यावर मेहनत घेतली.  समीरनं अंडर १४ पासून ते आयपीएलपर्यंत आपल्यातील धमक दाखवत स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं. दिल्ली कॅपिटल्सकडून तो ज्या तोऱ्यात खेळतोय ते पाहता लवकर समीर टीम इंडियात खेळताना दिसेल, असे चित्र निर्माण झाले आहे. समीर हा धोनीचा मोठा चाहता असून त्याच्याप्रमाणेच उत्तुंग फटकेबाजी करणं ही त्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे संयमी सुरुवात करून गियर बदलून स्फोटक रुप धारण करण्याची क्षमता त्याला 'लंबे रेस का घोडा...'ठरवणारी अशीच आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Sameer Rizvi's success story, fueled by his uncle's support.

Web Summary : Sameer Rizvi shines in IPL 2026, showcasing impactful cricket skills. His uncle's unwavering support, from childhood training to overcoming family obstacles, shaped his career. Rizvi's journey from a small village to IPL success is truly inspiring.
टॅग्स :आयपीएल २०२६दिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्सआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग