दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएल २०२६ च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात १६३ धावांचा बचाव करताना दीपक चाहरनं केएल राहुलच्या रुपात MI च्या संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर परफेक्ट यॉर्करसह प्रतिस्पर्धी संघातील बॅटरचा करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या षटकात रॉकेट थ्रोसह नितीश राणाच्या रुपात रन आउटच्या रुपात घेतलेली विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंहई इंडियन्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना केएल राहुल अवघ्या एका धावेवर तंबूत परतला. संघ अडचणीत असताना नितीश राणा याने बुमराह घेऊन आलेल्या दुसऱ्या षटकात चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. बुमराहने चपळाईन चेंडूवर जात एकदम रॉकेट थ्रोसह त्याचा डाव हाणून पाडला अन् दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला अवघ्या ७ धावांवर दुसरा धक्का दिला.
Web Summary : In IPL 2026, Jasprit Bumrah's rocket throw led to Nitish Rana's run-out. This crucial moment gave Mumbai Indians an early advantage against Delhi Capitals after Rahul's dismissal.
Web Summary : आईपीएल 2026 में, जसप्रीत बुमराह के रॉकेट थ्रो से नीतीश राणा रन आउट हुए। इस महत्वपूर्ण पल ने राहुल के आउट होने के बाद मुंबई इंडियंस को दिल्ली कैपिटल्स के खिलाफ शुरुआती बढ़त दिलाई।