IPL 2026 CSK vs DC Sanju Samson Century : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मेगा डीलसह राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून चेन्नई सुपर किंग्सचा झालेल्या संजू सॅमसन याने सलग तीन सामन्यातील अपयशानंतर यंदाच्या हंगामातील पहिली सेंच्युरी ठोकली आहे. पहिल्या तीन सामन्यात अनुक्रमे ६, ७ आणि ९ धावांवर अडखळलेल्या संजूनं चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध फलंदाजीचा खास नजराणा पेश करताना IPL मधील आपली चौथे शतक झळकावले. तीन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून शतक झळकवण्याचा खास डाव त्याने या शतकासह साधला आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकानंतर ५२ धावांवर त्याचा झेल सुटला. या संधीच सोनं करताना या पठ्ठ्यानं आयपीएल कारकिर्दीतील आपले पहिले आणि यंदाच्या हंगामातील पहिले शतक साजरे केले. चेन्नई सुपर किंग्सकडून २०१९ नंतर कोणत्याही बॅटरनं केलेले हे पहिले शतक आहे. याआधी ऋतुराज गायकवाडने CSK कडून शतकी खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.
कमालीची गोष्ट म्हणजे संजू सॅमसन याने २०१७ मध्ये दिल्लीच्या (दिल्ली डेअरडेविल्स) संघाकडून खेळताना रायझिंग पुणे सुपर जाएंट्स विरुद्ध IPL मधील पहिली सेंच्युरी ठोकली होती. या सामन्यात त्याने ६३ चेंडूत १०२ धावांची खेळी साकारली होती. २०१९ मध्ये राजस्थानच्या संघाकडून त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ५४ चेंडूत दुसरे IPL शतक साजरे केले होते. या सामन्यात त्याने ५५ चेंडूत १०२ धावांची खेळी केली होती. संजूच अखेरच शतक हे राजस्थानकडून पंजाबविरुद्ध ६३ चेंडूत ११९ धावांची खेळी साकारली होती.
Web Summary : After three low scores, Sanju Samson smashed a century against Delhi Capitals. He capitalized on a dropped catch, scoring his fourth IPL century and the first for CSK since 2019, joining Ruturaj Gaikwad. Previously, he scored centuries for Delhi and twice for Rajasthan.
Web Summary : लगातार तीन मैचों में असफल रहने के बाद, संजू सैमसन ने दिल्ली कैपिटल्स के खिलाफ शानदार शतक बनाया। उन्होंने एक छूटे हुए कैच का फायदा उठाया, अपना चौथा आईपीएल शतक बनाया और 2019 के बाद सीएसके के लिए पहला शतक बनाया, ऋतुराज गायकवाड़ के साथ शामिल हुए। इससे पहले, उन्होंने दिल्ली और राजस्थान के लिए दो बार शतक बनाए थे।