Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 

Venkatesh Iyer: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात व्यंकटेश अय्यर याने आपल्या कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 14:16 IST

Open in App

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात व्यंकटेश अय्यर याने आपल्या कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. एका बॉल बॉयने पायला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असता व्यंकटेश अय्यरने त्याला रोखले आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. व्यंकटेश अय्यरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

मुंबई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना एक बॉल बॉय धावत व्यंकटेश अय्यरच्या जवळ आला. अय्यरला समोर पाहून भारावलेल्या त्या मुलाने आदराने त्याच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृतीत आदर व्यक्त करण्याची ही पद्धत असली तरी, मैदानावर घडलेल्या या प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यंकटेश अय्यरने मुलाला पायाला स्पर्श करण्यापासून रोखल्याचे पाहायला मिळत आहे.

या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. चाहत्यांनी व्यंकटेश अय्यरच्या या कृत्याचे भरभरून कौतुक होत आहे. "खेळाडू हा केवळ त्याच्या खेळाने नाही, तर त्याच्या नम्रतेने मोठा होतो," अशी भावना नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. एका व्यक्तीने म्हटले आहे की, व्यंकटेशने दाखवून दिले की प्रसिद्धी मिळूनही पाय जमिनीवर कसे ठेवावेत. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, मैदानात विजय-पराजय होतच राहील, पण अशी कृत्य मन जिंकणारी आहेत."

English
हिंदी सारांश
Web Title : Venkatesh Iyer's gesture towards ball boy wins hearts in IPL 2026

Web Summary : Venkatesh Iyer won hearts during the Mumbai Indians vs. Royal Challengers Bangalore match. He stopped a ball boy from touching his feet and wished him well. This act of humility has gone viral, earning Iyer widespread praise for his respectful behavior on the field.
टॅग्स :आयपीएल २०२६वेंकटेश अय्यरऑफ द फिल्डव्हायरल व्हिडिओरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्स