Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Auction : परदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागली तर BCCI होणार मालामाल! ते कसं? जाणून घ्या सविस्तर

IPL 2026 Auction : आयपीएलच्या मिनी लिलावातील BCCI च्या 'वर कमाई'चा नियम काय सांगतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:39 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या हंगामासाठी १६ डिसेंबरला मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. अबू धाबी येथे होणाऱ्या मिनी लिलावासाठी एकूण १३५५ क्रिकेटपटूंनी नाव नोंदणी केली आहे. सर्वाधिक २ कोटी रुपयांच्या बेस प्राईजच्या यादीत ४५ खेळाडूंचा समावेस आहे. यात फक्त दोन भारतीय खेळाडूंचे नाव दिसून येते. याचा अर्थ मेगा लिलावात परदेशी खेळाडूंना अधिक भाव मिळेल याचे संकेत मिळतात. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

परदेशी खेळाडूवर १८ कोटींपेक्षा अधिक बोली लागली तर BCCI ला फायदा!

पण तुम्हाला माहितीये का? BCCI च्या नव्या नियमानुसार, मिनी लिलावात कोणत्याही परदेशी खेळाडूला १८ कोटींपेक्षा अधिक पैसा मिळणार नाही. खास गोष्ट ही की, फ्रँचायझी संघांना खेळाडूवर १८ कोटींपेक्षा अधिक बोली लावता येईल. पण अतिरक्त सर्व पैसा बीसीसीआयच्या खिशात जाईल. आगामी मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर कॅमरुन ग्रीवर मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळू शकते. २०२३ च्या लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने या खेळाडूसाठी १७.५ कोटी एवढी मोठी रक्कम मोजली होती. IPL च्या नव्या नियमानुसार ग्रीनसह कोणत्याही परदेशी खेळाडूला १८ कोटींपेक्षा अधिक पॅकेज मिळणार नाही. 

वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा

काय आहे IPL मधील 'मॅक्सिमम फी' संदर्भातील नियम?

ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, गतवर्षी लागू करण्यात आलेल्या  ‘मॅक्सिमम फी' नियमानुसार मिनी लिलावात कोणत्याही परदेशी खेळाडूला संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या ((Retain Players)) उच्चतम किंमतीपेक्षा जास्त रक्कम देता येणार नाही. सध्याच्या घडीला सर्वाधिक रिटेन्शन किंमत १८ कोटी रुपये आहे. त्यामुळेच या नियमानुसार मिनी लिलावात कोणत्याही परदेशी खेळाडूला १८ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळणार नाही.

१८ कोटींपेक्षा अधिक बोली लागली तर काय?

आयपीएलच्या मिनी लिलावात एखाद्या खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी फ्रँचायझीमध्ये चुरस रंगली तर बोलीचा आकडा १८ कोटींवर थांबणार नाही. हा आकडा २०-२२ कोटींपर्यंतही जाऊ शकतो. फक्त नियमानुसार, या परिस्थितीत खेळाडूला फक्त १८ कोटी फी मिळेल आणि त्यापेक्षा जेवळी अधिक बोली लागली तो पैसा बीसीसीआयच्या खात्यात जमा होईल. आयपीएलमधील सर्वात महागडे परदेशी खेळाडू

 मिचेल स्टार्क हा आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू आहे.  २०२३ च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने या ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी २४.७५ कोटी रक्कम मोजली होती. याच लिलावात सनरायझर्स हैदराबादच्या सघाने ऑस्ट्रेलिय कर्णधार पॅट कमिन्ससाठी २०.६ कोटी रुपयांची बोली लावली होती. या यादीत  सॅम करनचाही समावेश आहे. त्याच्यावर १८.५ कोटी एवढी मोठी बोली लागली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026 Auction: BCCI to profit big from expensive foreign players!

Web Summary : BCCI's rule states foreign players in IPL auction won't exceed ₹18 crore. Franchises can bid higher, with extra funds going to BCCI. Australian all-rounders could fetch high bids, but any amount above ₹18 crore goes to BCCI.
टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२६बीसीसीआयमुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादइंडियन प्रीमिअर लीगआयपीएल २०२४