Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका

पहिल्या सेटमध्ये IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिळाला, पण भारताच्या एकाही खेळाडूला मिळाला नाही भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:44 IST

Open in App

आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी अबू धाबीच्या एतिहाद अरेना येथे खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रियेच आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या लिलावाची सुरुवातही अनसोल्ड खेळाडूसह झाली. २ कोटींच्या मूळ किंमतीह लिलावात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन युवा स्फोटक बॅटर जेक फ्रेझर-मॅकगर्कला संघात घेण्यासाठी कुणीही रस दाखवला नाही. पहिल्या सेटमध्ये भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि सरफराज खान या जोडीचाही समावेश होता. दोघांनी ७५ लाख मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहेत. पण तरीही त्यांना भाव मिळाला नाही. दोघांनाही सलग दुसऱ्या लिलावात अनसोल्ड राहण्याची वेळ आली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पृथ्वीची IPL मधील कामगिरी

पृथ्वी शॉनं (Prithvi Shaw)  २०१८ च्या हंगामात IPL मध्ये पदार्पण केले. त्या हंगामात दिल्लीच्या संघानं (त्यावेळीचे नाव दिल्ली डेअरडव्हिल्स) त्याच्यासाठी १ कोटी २० लाख रूपये मोजले होते. पदार्पणाच्या हंगामातच पृथ्वी शॉचा धमाकाही पाहायला मिळाला. पहिल्या हंगामात ९ सामन्यात २ अर्धशतकासह त्याने २४५ धावा केल्या होत्या. तेव्हापासून प्रत्येक हंगामात तो दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसला. आतापर्यंत त्याने ७९ सामन्यात २३.९५ च्या स्ट्राइक रेटसह  १८९२ धावा केल्या असून यात १४ शतकांचा समावेश आहे. 

IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली

पृथ्वी-सरफराज यांच्यात कमालीचा योगायोगसरफराज खान याने २०१५ मध्ये RCB च्या संघाकडून IPL मध्ये पदार्पण केले होते. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी तो आयपीएल खेळला. पहिल्या हंगामात त्याला ५० लाख भाव मिळाला होता. पण कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे त्याची किंमत घसरली. २०१९ आणि २०२० च्या हंगामात सरफराज  २५ लाखांत पंजाबकडून खेळला होता. कमालीचा योगायोग म्हणजे पृथ्वीसह सरफराज कान यानेही अखेरचा IPL सामना हा दिल्लीच्या संघाकडून खेळला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026 Auction: Prithvi Shaw, Sarfaraz Khan remain unsold again.

Web Summary : Prithvi Shaw and Sarfaraz Khan went unsold at the IPL 2026 auction despite good domestic performance. Both players, with a base price of ₹75 lakh, found no buyers for the second consecutive auction. Shaw debuted in 2018, while Sarfaraz played his last IPL match for Delhi.
टॅग्स :आयपीएल लिलाव 2026आयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीगबीसीसीआयपृथ्वी शॉसर्फराज खान