Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार

IPL 2026 Auction Mumbai Indians: रायन रिकल्टन ऐवजी 'हा' अनुभवी खेळाडू सलामीला खेळू शकतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:55 IST

Open in App

Mumbai Indians IPL 2026 Auction: आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स यंदाच्या लिलावात एका स्टार सलामीवीराच्या खरेदीने खाते उघडले. नुकतेच टीम इंडियाविरूद्ध भारतीय जमिनीवर दमदार शतक ठोकणारा सलामीवीर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. रायन रिकल्टनला बॅक-अप म्हणून दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) पुन्हा एकदा मुंबईच्या संघात सामील झाला आहे. याआधीही क्विंटन डी कॉक मुंबईच्या संघात खेळला होता. त्यामुळे आता रोहित शर्माला (Rohit Sharma) सलामीसाठी रिकल्टनऐवजी नवा जोडीदार डी कॉक मिळणार अशी शक्यता आहे.

डी कॉक वर कितीची बोली?

लिलावाआधी मुंबईने ट्रेड डील करत तीन खेळाडूंना संघात दाखल करुन घेतले होते. त्यासोबत त्यांनी तब्बल १७ खेळाडूंना रिटेन केले. त्यामुळे लिलावात उतरताना त्यांच्याकडे केवळ ५ खेळाडूंच्या जागा शिल्लक असून, ३ कोटींपेक्षा कमी किंमत पर्समध्ये होती. अशा वेळी मुंबई इंडियन्सच्या चलाख व्यवस्थापनाने अवघ्या १ कोटीच्या मूळ किमतीत क्विंटन डी कॉक सारखा हिरा पदरात पाडून घेतला.

ट्रेड डीलमध्ये कुणाला घेतले?

मुंबई इंडियन्सने आपली कोअर टीम असलेले रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह १७ खेळाडू रिटेन केले. त्यानंतर ट्रेड डीलद्वारे शार्दूल ठाकूर, शेरफेन रुदरफोर्ड आणि मयंक मार्कंडे यांना संघात घेतले. त्यातच आता क्विंटन डी कॉकचे नाव समाविष्ट झाले आहे.

मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले खेळाडू: 

हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिंज, नमन धीर, विल जॅक्स, मिशेल सँटनर, कॉर्बिन बॉश, राज अंगद बावा, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गजनफर, अश्वनी कुमार, रघू शर्मा

मुंबईने रिलीज केलेले खेळाडू:

बेवन जेकब्स, केएल श्रीजीत, विग्नेश पुथुर, कर्ण शर्मा, लिजाद विलियम्स, सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान, रीस टॉप्ली

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026 Auction: Mumbai Indians Buy Quinton De Kock, Rohit's New Partner

Web Summary : Mumbai Indians acquired Quinton De Kock in the IPL 2026 auction for ₹1 crore. De Kock, previously with Mumbai, might open with Rohit Sharma. Mumbai retained 17 players and traded for three others, entering the auction with limited funds.
टॅग्स :आयपीएल २०२६आयपीएल लिलाव 2026मुंबई इंडियन्सरोहित शर्माक्विन्टन डि कॉकद. आफ्रिका