Indian Premier League 2026 Auction Live Streaming : आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी अबूधाबी येथे १० फ्रँचायझी संघ मिनी लिलावाच्या माध्यमातून संघ बांधणी करताना दिसणार आहेत. मिनी लिलावासाठी १००० हून अधिक खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. BCCI नं यातील ३५० खेळाडूंची अंतिम यादी तयार केली. यामध्ये २४० भारतीय आणि ११० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, २२४ भारतीय अनकॅप्ड आणि १० परदेशी अनकॅप्ड खेळाडूंवर यंदा बोली लागणार आहे. अंतिम यादीत आणखी १९ धावांची भर पडली असून लिलावात उतरणाऱ्या खेळाडूंची संघ्या ही ३६९ वर पोहचला आहे. नव्याने अपडेट करण्यात आलेल्या यादीत बंगाल संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन याचाही समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१० फ्रँचायझी संघातील ७७ रिक्त जागेसाठी ३६९ खेळाडूंवर लागणार बोली
दहा फ्रँचायझी संघांमध्ये एकूण फक्त ७७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. यंदाच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या पर्समध्ये सर्वाधिक ६४.३ कोटी एवढी रक्कम आहेत. याशिवाय चेन्नई सुपर किंग्जच्या संघाच्या पर्समध्येही ४३.४ कोटी एवढी तगडी रक्कम आहे. हे दोन संघ लिलावात सर्वाधिक बोली लावताना पाहायला मिळेल.
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण... मिनी लिलावात RTM कार्डचा वापर करता येत नाही
यंदाचा लिलाव मिनी ऑक्शन स्वरूपात होणार आहे. त्यामुळे इथं RTM कार्डच्या माध्यमातून फ्रँचायझींना डाव खेळता येणार नाही. याचा अर्थ सर्व १० संघांना लिलावात सहभागी खेळाडूंवर बोली लावण्याची संधी असेल.
लिलाव कधी होणार?
मंगळवार, १६ डिसेंबर २०२५
IPL मिनी लिलाव किती वाजता सुरू होईल?
दुपारी २.०० वाजता (IST)
लिलाव कुठे होणार?
Etihad Arena, अबू धाबी (यूएई)
थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून क्रिकेट चाहते मिनी लिलावातील घडामोडी पाहू शकतात.
ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
JioHotstar अॅप व वेबसाईटवर (सक्रिय सबस्क्रिप्शन आवश्यक)
IPL 2026 मिनी लिलावातील संघ पर्समधील रक्कम आणि स्लॉट
- कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) ६४.३ कोटी | १३ स्लॉट (खेळाडूंची रिक्त जागा)
- चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) ४३.४ कोटी | ९ स्लॉट (खेळाडूंची रिक्त जागा)
- सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) २५.५ कोटी | १० स्लॉट (खेळाडूंची रिक्त जागा)
- लखनौ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) २२.९५ कोटी | ६ स्लॉट (खेळाडूंची रिक्त जागा)
- दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) २१.८ कोटी | ८ स्लॉट (खेळाडूंची रिक्त जागा)
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) १६.४ कोटी | ८ स्लॉट (खेळाडूंची रिक्त जागा)
- राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) १६.०५ कोटी | ९ स्लॉट (खेळाडूंची रिक्त जागा)
- गुजरात टायटन्स (Gujarat Titans) १२.९ कोटी | ५ स्लॉट (खेळाडूंची रिक्त जागा)
- पंजाब किंग्ज (Punjab Kings) ११.५ कोटी | ४ स्लॉट (खेळाडूंची रिक्त जागा)
- मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) २.७५ कोटी | ५ स्लॉट (खेळाडूंची रिक्त जागा)
Web Summary : The IPL 2026 auction in Abu Dhabi will feature 369 players vying for 77 slots across 10 franchises. Kolkata Knight Riders have the highest purse (₹64.3 crore). The auction is on December 16, 2025, at 2:00 PM IST and will be broadcast on Star Sports and JioHotstar.
Web Summary : अबू धाबी में आईपीएल 2026 की नीलामी में 369 खिलाड़ी 10 फ्रेंचाइजी में 77 स्लॉट के लिए प्रतिस्पर्धा करेंगे। कोलकाता नाइट राइडर्स के पास सबसे अधिक पर्स (₹64.3 करोड़) है। नीलामी 16 दिसंबर, 2025 को दोपहर 2:00 बजे IST पर है और इसका प्रसारण स्टार स्पोर्ट्स और जियो हॉटस्टार पर किया जाएगा।