IPL 2026 Auction Liam Livingstone Sold To Kavya Maran Own Sunrisers Hyderabad : इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) आगामी IPL हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या लिलावात काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने (Sunrisers Hyderabad) अनसोल्ड राहिलेल्या या खेळाडूवर १३ कोटींची बोली लावल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी अनसोल्ड राहिला, मग...
आयपीएलच्या यंदाच्या लिलावात लियाम लिविंगस्टोन याने २ कोटी या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. पहिल्यांदा त्याचे नाव आले त्यावेळी १० पैकी एकाही फ्रँचायझी संघाने त्याला संघात घेण्यात रस दाखवला नाही. पहिल्या फेरीत हा स्टार खेळाडू अनसोल्ड राहिल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण दुसऱ्या फेरीत पुन्हा त्याचे नाव आले त्यावेळी मात्र त्याला संघात घेण्यासाठी एका पेक्षा एक फ्रँचायझी संघ पुढे येताना दिसले.
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
KKR आणि GT आउट झाल्यावर LSG अन् SRH फ्रँचायझीमध्ये चढाओढीचा खेळ, शेवटी...
दुसऱ्यांदा लिविंगस्टोनचे नाव आल्यावर कोलकाता नाईट रायडर्सं संघाने इंग्लंडच्या ऑलराउंडरवर पहिल्यांदा बोली लावली. त्यानंतर गुजरात टायन्सने आपला डाव खेळला. सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून काव्या मारन हिने अनसोल्ड परदेशी खेळाडूला आपल्यात घेण्याचा डाव खेळल्यावर LSG कडून संजीव गोएंका पिक्चरमध्ये आले. पण शेवटी काव्या मारन हिने पर्समधून १३ कोटी काढण्याची तयारी दर्शवली अन् ते फक्त बघतच राहिले.
गत हंगामात RCB च्या ताफ्यातून खेळताना दिसला होता लियाम लिविंगस्टोन
लियाम लिविंगस्टोन हा टी-२० जगभरातील लीगमध्ये खेळणारा अनुभवी खेळाडू आहे. टी-२० कारकिर्दीतत्याने १४५य०६ च्या सरासरीनं आपली खास छाप सोडली आहे. IPL च्या गत हंगामात पहिली वहिली ट्रॉफी जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचातो भाग होता. या हंगामात त्याची कामगिरी उल्लेखनिय नव्हती. पण एकंदरीत त्याचा रेकॉर्ड हा दमदार आहे. त्याच जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने त्याच्यावर तगडी बोली लावत संघ अधिक मजबूत करण्याचा डाव खेळला आहे.
अनसोल्ड राहिल्यावर गाठला IPL मधील सर्वोच्च कमाईचा आकडा
२०१९ च्या हंगामात लियाम लिविंगस्टोन याने राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून पदार्पण केले होते. त्यावेळी त्याला फक्त ५० लाख रुपये मिळाले होते.२०२१ च्या हंगामात याच फ्रँचायझीकडून तो ७५ लाखात खेळला. २०२२ ते २०२४ या हंगामत पंजाबने त्याला प्रत्येकी ११.५० कोटी एवढीरक्कम मोजली.गत हंगामात RCB च्या संघाकडून खेळताना त्याचे पॅकेज ८.७५ कोटींवर घरसले. आता अनसोल्ड राहिल्यावर त्याने १३ कोटींसह IPL मधील सर्वोच्च कमाईचा आकडा गाठला आहे.