Why Umpires Check Bat Checks IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात काही सामन्यात मैदानातील पंच फलंदाजांची बॅट तपासताना पाहायला मिळत आहे. हे दृश्य पाहिल्यावर काही क्रिकेट चाहत्यांना ही काय भानगड? असा प्रश्न पडू शकतो. काहींना तर २००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला पराभूत केल्यावर गाजलेला रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंगा होत्या हा गाजलेला किस्साही आठवला असेल. पण ही भानगड तशी जुनीच आहे. फक्त टाक्स नवे असल्याचे दिसते. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL 2025 च्या हंगामात अचानक पंच का तपासत आहेत बॅट?
आयपीएल स्पर्धेला सुरुवात होऊन २ आठवडे झाल्यावर मैदानात पंच काही फलंदाजांची बॅट तपासताना दिसून आले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून खेळणारा देवदत्त पडिक्कल आणि राजस्थान रॉयल्सच्या संघातील हेटमायर यांची मैदानात पंच बॅट तपासतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होताना दिसले. आयसीसीने निर्धारित केलेल्या नियमानुसार, फलंदाज बॅट वापरत आहेत, याची खात्री करण्यासाठी पंच बॅटची तपासणी करताना दिसताहेत. आवश्यकतेनुसार बॅट तपसा, असे निर्देश सामनाधिकाऱ्यांनी पंचांना दिले आहेत. त्यामुळेच पंच काही फलंदाजांची बॅट तपासत आहेत.
आधी २४ यार्ड्समधील 'दुश्मनी'चं प्रकरण गाजलं; आता रिलीज झालं बुमराह-नायर यांच्यातील 'दोस्ती'चं गाणं
बॅटच्या आकारासंदर्भातील नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियमानुसार, बॅटची जाडी ४.२५ इंच (१०.७९ सेंमी), मधल्या भागाची जाडी २.६४ इंच (६.७ सेंमी) तर काठाची जाडी १.५६ इंच (चार सेंमी) हून अधिक असू नये. याशिवाय बॅटची लांबी ३८ इंच (९६.४ सेंमी) हून अधिक असू नये. हेच तपासण्यासाठी मैदानातील पंच 'बॅट गेज' उपकरणाच्या माध्यमातून फलंदाजांची बॅटत तपासताना दिसत आहे.
आधी ड्रेसिंग रुममध्ये तपासली जायची बॅट, आता...
आता हा नियम काही यंदाच्या हंगामापासून लागू झालेला नाही. याआधीही फलंदाजांची बॅट तपासली जायची. फक्त हे टास्क पंच मॅच सुरु होण्याआधी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन करायचे. पण सध्याच्या घडीला फलंदाज अनेकदा वेगवेगळ्या बॅट्स वापरतात. त्यामुळेच पंचांना मैदानात बॅटची तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.