Join us

प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव

लुंगी एनिगडी हा वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिप फायनलसाठी निवडलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा भाग आहे. त्यामुळे तो २६ मेला RCB ची साथ सोडून मायदेशी परतणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:15 IST

Open in App

RCB Signed Zimbabwe pacer as Lungi Ngidi Replacement : आयपीएल २०२५ च्या प्लेऑफ्सच्या लढती आधी RCB नं एक मोठा डाव खेळला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने झिम्बाब्वेचा जलदगती गोलंदाज ब्लेसिंग मुजराबानी याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. मुजराबानी याची लुंगी एनिगडीच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाच्या जागी झिम्बाब्वेच्या भिडूची एन्ट्री

लुंगी एनिगडी हा वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिप फायनलसाठी निवडलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा भाग आहे. त्यामुळे तो २६ मेला RCB ची साथ सोडून मायदेशी परतणार आहे. आरसीबीच्या संघाने प्लेऑफ्समध्ये प्रवेश केला असून त्याच्या जागी रिप्लेसमेंटच्या रुपात मुजराबानी याला संधी मिळाली आहे. 

भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

रोहित-शुबमन गिलसह त्याने या स्टार भारतीय क्रिकेटर्सपटूंची केलीये शिकार 

आरसीबीच्या ताफ्यात सामील झालेल्या ब्लेसिंग मुजराबानी याने २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-झिम्बाब्वे यांच्यातील लढतीत रोहित शर्माला आखुड टप्प्याच्या चेंडूवर आपल्या जाळ्यात फसवले होते. याशिवाय त्याने टी-२० क्रिकेटमध्ये शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड या भारतीय स्टार फलंदाजांना प्रत्येकी २-२ वेळा आउट केले आहे. याशिवाय संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माचीही विकेट त्याच्या खात्यात जमा आहे.

RCB नं झिम्बाब्वेच्या गोलंदाजासाठी किती रुपये मोजले?

ब्लेसिंग मुजराबानी याच्यासाठी आरसीबीच्या संघाने ७५ लाख रुपये मोजले आहेत. याआधी तो आयपीएल २०२२ च्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यात नेट बॉलरच्या रुपात दिसला होता. आरसीबीच्या ताफ्यातील हेजलवूडही दुखापतीतून सावरून संघात सामील झालाय. पण तोही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असल्यामुळे तो प्लेऑफ्स खेळणार की, नाही याबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे प्लेऑफ्समध्ये मुजराबानीला संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. 

कशी राहिलीये ब्लेसिंग मुजराबानीची कारकिर्द? 

ब्लेसिंग मुजराबानीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं तर झिम्बाब्वे कडून तो १२ कसोटी, ५५ वनडे आणि ७० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळला आहे.  पाकिस्तान सुपर लीग, इंटरनॅशनल लीग टी २० आणि कॅरेबियन प्रीमिअर लीगसह तो अनेक टी-२० लीगमध्ये खेळला आहे. तो आयपीएलमध्ये खास छाप सोडणार का ते पाहण्याजोगे असेल.

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५इंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट