Join us

IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

इथं जाणून घेऊयात किंग कोहलीनं सेट केलेल्या खास विक्रम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 20:35 IST

Open in App

Virat Kohli Records : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं डावातील तिसऱ्याच षटकात खलील अहमदच्या गोलंदाजीवर आक्रमक पवित्रा घेताना सलग दोन षटकार मारले. या दोन षटकारांसह किंग कोहलीनं दोन खास विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये एका  फ्रँचायझी संघाकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम कोहलीनं करून दाखवलाय. एवढेच नाही तर या सामन्यात त्याने एका मैदानात सर्वाधिक षटकाराचा विक्रमही आपल्या नावे नोंदवलाय. इथं जाणून घेऊयात किंग कोहलीनं सेट केलेल्या खास विक्रम...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

षटकारांचं 'त्रिशतक', असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला. २००८ पासून सुरु असलेल्या पहिल्या हंगामापासून विराट कहोली हा आरसीबी फ्रँचायझीकडून खेळताना दिसते. त्याने या संघाकडून ३०० षटकारांचा पल्ला पार केला आहे. एका फ्रँचायझीकडून सर्वाधिक ३०० षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. या यादीत ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आरसीबी संघाकडून २६३ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे. 

IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

टी-२० क्रिकेटमध्ये एका फ्रँचायझी संघाकडून सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

  • ३०१ - विराट कोहली  (आरसीबी)*
  • २६३ - ख्रिस गेल (आरसीबी)
  • २६२ - रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
  • २५८ - केरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स)
  • २५७ - महेंद्रसिंह धोनी (चेन्नई सुपर किंग्ज) 

एका स्टेडिमवर सर्वाधिक षटकार मारण्याचाही पराक्रम

विराट कोहलीनं बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सर्वाधिक १५२* षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावे जमा केला. याआधी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावे होता. त्याने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर १५१ षटकार मारले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही गेलच दिसतो. मिरपूरच्या मैदानात गेलनं टी-२० मध्ये १३८ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे. ॲलेक्श कॅरीनं नॉटिंघमच्या मैदानात १३५ षटकार मारल्याचा विक्रम असून रोहित शर्मानं मुंबईतील वानखेडच्या मैदानात १२२ षटकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकांच्या विक्रमाशी बरोबरी

विराट कोहलीनं चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमधील ६२ वे अर्धशतक साजरे केले. यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकांच्या डेविड वॉर्नरच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्सविराट कोहलीइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट