Join us

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स संघानं अनुभवी खेळाडूकडे दिली उप-कर्णधारपदाची जबाबदारी

या शर्यतीतून बाहेर पडल्यावर त्याच्या गळ्यात आता उप कर्णधार पदाची माळ गळ्यात पडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 17:31 IST

Open in App

IPL 2025 Veteran Faf Du Plessis Appointed Vice Captain Of Delhi Capitals : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला अवघे काही दिवस उरले आहेत. २२ मार्चपासून आयपीएलच्या १८ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामासाठी सर्वात शेवटी अक्षर पटेलच्या रुपात आपल्या कर्णधाराची घोषणा करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं आता अनुभवी चेहऱ्याला उप कर्णधार म्हणून पसंती दिलीये. दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर फाफ ड्युप्लेसी याच्याकडे यंदाच्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सनं ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवलीये.  हा निर्णय या खेळाडूच्या अनुभवाचा संघासाठी योग्य वापर करुन घेण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आरसीबीच्या माजी कॅप्टनवर दिल्लीच्या संघानं लावली होती कोट्यवधीची बोली

फाफ डुप्लेसिस दिल्ली कॅपिटल्स संघात सामील होण्याआधी २०२२ ते २०२४ या हंगामात आरसीबीचा कॅप्टन होता.  आरसीबीने २०२५ च्या मेगा लिलावाआधी त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने २ कोटी या मूळ किंमतीसह या अनुभवी खेळाडूला आपल्या ताफ्यातसामील करून घेतले. तो लोकेश राहुल आणि अक्षर पटेलसह कॅप्टन्सीच्या शर्यतीतही होता. या शर्यतीतून बाहेर पडल्यावर त्याच्या गळ्यात आता उप कर्णधार पदाची माळ गळ्यात पडली आहे.

तगड्या अनुभवामुळे मिळाली मोठी जबाबदारी

फाफ ड्युप्लेसिस हा २०१२ पासून आयपीएलमध्ये खेळतोय. आतापर्यंत त्याने १४५ सामन्यात ३७ अर्धशतकासह १३६.३७ च्या स्ट्राईक रेटनं ४५७१ धावा केल्या आहेत. त्याची उप कर्णधारपदी निवड करत दिल्लीच्या संघानं अक्षर पटेलचा भार बऱ्यापैकी हलका केला आहे. पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना फाफ ड्युप्लेसीकडून त्याला निश्चितच चांगले मार्गदर्शन मिळू शकते. एवढेच नाही तर या निर्णयासह अनुभवी बॅटर दिल्लीचा प्रमुख सदस्य आहे, याचे संकेतच दिल्लीच्या ताफ्यातून देण्यात आले आहेत.   

आयपीएल २०२५ साठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ

अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर/बॅटर), जेक-फ्रेजर मॅकगर्क, करुण नायर, फाफ डुप्लेसिस (उप-कर्णधार), डोनोवन फरेरा, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नलकांडे, विपराज निगम, अजय मंडल, मनवंत कुमार एल, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, टी नटराजन, मोहित शर्मा, मुकेश कुमार, दुष्मंता चमीरा, कुलदीप यादव. 

टॅग्स :एफ ड्यु प्लेसीसइंडियन प्रिमियर लीग २०२५अक्षर पटेलदिल्ली कॅपिटल्स