आयपीएल गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, नमस्कार करत घेतला आशीर्वाद

IPL 2025: यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यात गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत शतकी खेळी करत वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:33 IST2025-05-30T15:33:03+5:302025-05-30T15:33:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025: Vaibhav Suryavanshi meets Prime Minister Narendra Modi | आयपीएल गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, नमस्कार करत घेतला आशीर्वाद

आयपीएल गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, नमस्कार करत घेतला आशीर्वाद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यात गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत शतकी खेळी करत वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला होता. दरम्यान, वैभव सूर्यवंशीने आज बिहारमधील पाटणा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींची भेट घेतल्यावर वैभव सूर्यवंशीने त्यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले.

यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने एकूण ७ सामने खेळले होते. त्यात त्याने ३६ च्या सरासरीने २५२ धावा काढल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा २०६.५५  एवढा राहिला. तसेच वैभव सूर्यवंशीने एकूण १२२ चेंडूंचा सामना करताना १८ चौकार आणि २४ षटकारही ठोकले.

आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर वैभव सूर्यवंशीचे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे आयपीएल २०२५ च्या लिलावामध्ये त्याला आपल्या संघात घेण्यासाठी विविध फ्रॅन्चायझींमध्ये चढाओढ लागली होती. वैभव सूर्यवंशीचा बेस प्राईस ३० लाख होती. अखेरीस राजस्थान रॉयल्सने त्याला १.१० कोटी रुपयांना खरेदी केले होते.   

Web Title: IPL 2025: Vaibhav Suryavanshi meets Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.