Join us

IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ

Vaibhav Suryavanshi Viral Video: वैभव सूर्यवंशी आणि नितीश राणा यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे्.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:34 IST

Open in App

राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि नितीश राणा यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. १४ वर्षांच्या या खेळाडूने नितीन राणाकडे एक बॅट मागितली आणि त्याच्याकडे आधीच ८ बॅट सांगितले. हे ऐकल्यानंतर नितीश राणाही शॉक झाला आणि त्याने विराट कोहलीकडेही इतक्या बॅट नसतील, असे विनोदाने म्हटले.

वैभव सुर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक झळकावून क्रिकेट जगतात धुमाकूळ घातला. याशिवाय, तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक आणि अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. परंतु, मुंबई इडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. वेगवान गोलंदाज दीपक चहरने त्याला शून्यावर बाद केले.

जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून १०० धावांनी पराभव पत्करावा लागल्याने रॉयल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १६ व्या षटकांत ११७ धावांवर गुंडाळला. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३० धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने २० षटकांत २१७ धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी पहिल्या विकेट्ससाठी ११६ धावांची भागिदारी रचली. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबईने राजस्थानसमोर २१७ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. या सामन्यात ६१ धावांची वादळी खेळी करणारा रायन रिकेल्टन सामनावीर ठरला.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५राजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्सव्हायरल फोटोज्