भारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी क्रिकेट आणि मनोरंजनाची वार्षिक पर्वणी असलेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा अठरावा हंगाम सध्या रंगला आहे. सलाबादप्रमाणे यावर्षीही थरारक लढती आणि देशातील आणि जगभरातील खेळाडूंच्या धडाकेबाज खेळाचा आनंद क्रिकेटप्रेमी लुटत आहेत. २००८ साली बीसीसीआयने सुरू केलेल्या या स्पर्धेने भारतीय आणि जागतिक क्रिकेटचं रूपडंच बदलून टाकलं आहे. तसेच या लीगचं नाव जरी इंडियन प्रीमियर लीग असली तरी ती एक ग्लोबल लीग आणि क्रिकेट तसेच इतर खेळांमधील एक यशस्वी ब्रँड बनली आहे. क्रिकेटला धनदौलत आणि ग्लॅमरचा तडका देणाही ही स्पर्धा जगभरातील क्रिकेटपटू, क्रिकेटप्रेमी आणि जाहिरातदार यांच्यासाठी आकर्षणाचं केंद्र बनलीय. एवढंच नाही तर नवनवी आव्हाने, तंत्रज्ञान आणि ट्रेंड यांच्याशी जुळवून घेत ही स्पर्धा दिवसेंदिवस अधिकाधिक यशस्वी आणि लोकप्रिय होत आहे. या पार्श्वभूमीवर आता या स्पर्धेचा अठरावा हंगाम सुरू असताना सुरुवातीपासून आतापर्यंत ही लीग एक जागतिक स्पर्धा म्हणून कशी विकसित होत गेली, त्याचा घेतलेला हा आढावा. (IPL संबंधीचे अधिक किस्से आणि तपशील जाणून घेण्यासाठी लॉग ऑन कराःः Zuplay.com)
असा झाला आयपीएलचा जन्म (२००८)क्रिकेट हा धर्म आणि क्रिकेटपटूंना देवाचा दर्जा देणाऱ्या भारतीय क्रिकेटप्रेमींसमोर २००८ साली आयपीएलच्या रूपात एक नव्या प्रकारचं क्रिकेट सादर केलं गेलं. त्याकाळात परंपरागत कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटसमोर नव्याने आलेल्या टी-२० क्रिकेटने आव्हान निर्माण करण्यास सुरुवात केली होती. खरंतर जगभरात टी-२० लीग लोकप्रिय होत असताना भारतात मात्र क्रिकेटची सर्वेसर्वा असलेल्या बीसीसीआयचा टी-२० क्रिकेटला तीव्र विरोध होता. पण त्याच वेळी इंग्लिश प्रीमियर लीग आणि एनबीए या जागतिक पातळीवरील यशस्वी लीगमधून प्रेरणा घेत भारतात झी समुहाकडून इंडियन क्रिकेट लीगची सुरुवात करण्यात आली. एवढंच नाही तर कपिल देव यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंना या लीगने आपल्यासोबत जोडून घेतले होते. तसेच भारतातील आणि जगभरातील अनेक लहान मोठे खेळाडू या लीगशी जोडले जाऊ लागले होते. त्यामुळे बीसीसीआयसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आयसीएलला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि जागतिक पातळीवर वेगाने लोकप्रिय होत असलेल्या टी-२० क्रिकेटचा फायदा उचलण्यासाठी बीसीसीआयने आयपीएलची सुरुवात केली. तसेच विविध शहरांचं आणि राज्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ संघांसह १८ एप्रिल २००८ रोजी सुरुवात झाली. तेव्हा क्रिकेट खेळत असलेले अनेक दिग्गज या स्पर्धेत खेळल्याने ही स्पर्धा पहिल्या दिवसापासून यशस्वी झाली. तसेच या पहिल्या हंगामामध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सच्या रूपात आयपीएलला पहिला विजेता मिळाला.
फ्रँचायझी मॉडेलचा उदय आणि स्पर्धेताला मिळालेलं जागतिक रूप (२००९ ते २०१५) २००८ साली आयोजित केलेला स्पर्धेचा पहिलाच हंगाम कमालीचा यशस्वी झाल्यानंतर आयपीएलच्या कक्षा कमालीच्या विस्तारल्या. जगभरातील खेळाडू या स्पर्धेकडे आकर्षित होऊ लागले. तसेच स्पर्धेलाही जागतिक पातळीवर लोकप्रियता मिळू लागली. दरम्यान, २००९ साली भारतात होत असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे आयपीएलचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं. खरंतर स्पर्धे देशाबाहेर आयोजित होत असल्याने ती कितपत यशस्वी होईल याबाबत शंका होती. मात्र तिथेही अनेक आव्हानांचा सामना करत ही स्पर्धा यशस्वी ठरली.
उल्लेखनीय बाब म्हणजे स्पर्धेच्या यशाचा फायदा संघांच्या फ्रॅन्चायझींनाही झाला. या फ्रॅन्चायझींचं बाजारमूल गगनाला भिडलं. एवढंच नाही तर बॉलिवूड कलाकार, उद्योगपती आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार यांचा फ्रँचायझींच्या मालकांमध्ये समावेश असल्याने स्पर्धेला वेगळी ओळखही मिळाली. या स्पर्धेमुळे महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि ए.बी. डीव्हिलियर्स यांसारखे खेळाडू घराघरातील सदस्यांसारखे बनले, तर चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स हे सर्वात प्रभावशाली संघ म्हणून समोर आले. तसेच त्यांच्यामधील लढती ह्या चाहत्यांना रोमांचक अनुभव देणाऱ्या पर्वणी बनल्या. आव्हानं आणि वादविवाद (२०१६ ते २०१८)आयपीएल ही स्पर्धा जेवढी यशस्वी झाली. तसेच या स्पर्धेतील विक्रम, खेळाडूंच्या खेळी यांची जेवढी चर्चा झाली, तेवढेच या स्पर्धेतील वादविवादही चर्चेत राहिले. अगदी स्पर्धेच्या पहिल्या हंगामात हरभजन सिंग आणि एस. श्रीशांत यांच्यात झालेलं थप्पडकांड चाहते अद्याप विसरलेले नाहीत. मात्र २०१३ साली उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली. तसेच स्पर्धेच्या विश्वसनियतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर काही खेळांडूंवर बंदीची कारवाई करण्यात आली. तर चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन हंगामांसाठी बंदी घालण्यात आली. यादरम्यान, गुजरात लॉयन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या नव्या संघांना दोन हंगामांसाठी संधी देण्यात आली. पुढे २०१८ मध्ये बंदीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे आयपीएलमध्ये पुनरागमन झाले. एवढंच नाही तर आयपीएल प्रशासनाने केलेल्या सकारात्मक प्रयत्नांमुळे स्पर्धेची विश्वसनियताही पुन्हा प्रस्थापित झाली. आज आयपीएल ही जगातील सर्वोत्कृष्ट टी-२० लीग बनली आहे.
तांत्रिक प्रगती आणि चाहत्यांचा वाढता पाठिंबा (२०१९ ते २०२३)खेळामधील तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आयपीएल ही सुरुवातीपासूनच आघाडीवर राहिलेली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम (डीआरएस), विश्लेषणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हॉक आय सारख्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे खेळामधील अचूकता वाढली आहे. याचदरम्यान आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे आयपीएलसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र खेळाडू आणि स्पर्धेशी संबंधित व्यक्तींच्या सुरक्षेसाठी बायो बबलसारख्या पद्धतींचा वापर करत या स्पर्धेचं यशस्वीरीत्या आयोजन करून दाखवण्यात आलं होतं.
याच काळात क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाच्या माध्यमांमध्येही मोठे बदल घडून आले. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग मिळाला. त्यासाठी स्पर्धेने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करत जगभरातील चाहत्यांना स्मार्टफोन्स आणि स्मार्ट टीव्हीवर आयपीएलचे सामने पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्चुअल रियालिटीच्या अनुभवांमुळे चाहते आणि खेळामधील अंतर खूप कमी झालं आहे. तसेच त्या माध्यमातून ही स्पर्धा अधिकच मनोरंजक बनली आहे. स्पर्धेचा विस्तार आणि नवा काळ (२०२२ ते २०२५)आयपीएलची लोकप्रियता हंगामागणिक वाढत असतानाच २०२२ मध्ये स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स या नव्या संघांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या संघांची संख्या १० वर पोहोचली. तसेच यामुळे लीगमधील स्पर्धात्मक वातावरण आणि अनिश्चितताही अधिक वाढली. एवढंच नाही तर गुजरात टायटन्सच्या संघाने आपल्या पहिल्याच हंगामात विजेतेपदावर नव कोरलं. त्यामधून ही स्पर्धा सातत्याने विकसित होत असल्याचे आणि खेळाबद्दल नवनव्या कल्पना समोर आणत असल्याचे सिद्धही झाले.
आयपीएलचा यंदाचा हंगाम तर खास असाच आहे. या हंगामात लीगमध्ये आणखी नवनव्या कल्पनांचा स्वीकार करण्यात आला आहे. स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचं विश्लेषण करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अत्याधुनिक आणि स्मार्ट स्टेडियममुळे चाहत्यांना वेगळीच अनुभूती देत आहेत. शिवाय शाश्वत हरित उपक्रमांमुळे स्पर्धा कशा प्रकारे कार्य करत आहे, हे दिसून येत आहे. आयपीएल प्रेक्षकसंख्या, प्रायोजक आणि चाहत्यांच्या सहभागाबाबतचे विक्रम सातत्याने मोडीत काढत आहे, त्यामुळे ही स्पर्धा आता जागतिक पाळीवरील सर्वात मोठ्या मौल्यवान क्रीडा लीगपैकी एक बनली आहे.
आयपीएलचं भवितव्य कसं असेल?आयपीएलचा आतापर्यंतचा प्रवास पाहिल्यास ही स्पर्धा वर्षागणिक अधिकाधिक यशस्वी होत गेल्याचं दिसून येतं. आता पुढे पाहिल्यास जागतिक पातळीवर विस्तार होण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि इतर क्रिकेटची लोकप्रियता असलेल्या देशांमध्ये आयपीएलचे प्रदर्शनीय सामने आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. एवढंच नाही तंत्रज्ञानामधील प्रगतीसह फ्रॅन्चायझी आता एनटीएफ, ब्लॉकचेनवर आधारित तिकिटिंग आणि एआयवर आधारित चाहत्यांच्या प्रतिक्रियांबाबत चाचपणी करत आहेत.
या सर्वासोबत ही लीग अनेक युवा क्रिकेटपटूंना आकर्षित करत आहे. तसेच ही स्पर्धा उगवत्या खेळाडूंना त्यांचं कौशल्य दाखवून देण्यासाठी मंच उपलब्ध करून देत आहे. या स्पर्धेत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडून खांद्याला खांदा लावून खेळतात. त्यामुळे या माध्यमातून आयपीएल क्रिकेटच्या भविष्याला आकार देण्याचं कामही करत आहे.
निष्कर्षः थोडक्यात वर्णन करायचं तर आयपीएलचा २००८ ते २०२५ या काळातील प्रवास हा असामान्य असाच आहे. भारतीय क्रिकेटमधील एक धाडसी प्रयोग म्हणून सुरू झालेल्या या स्पर्धेने अल्पावधीतच खेळावर प्रभाव पाडणाऱ्या क्रिकेटमधील एका जागतिक उत्सवाचं रूप धारण केलं आहे. सातत्याने आणलं जाणारं नाविन्य, निकोप स्पर्धात्मक वातावरण आणि निष्ठावंत चाहत्यांचा भक्कम पाठिंबा यामुळे आयपीएल पुढची अनेक वर्षे जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवणार हे जवळपास निश्चित आहे. जसजसे आपण पुढे जात आहोत. त्यामधून एक गोष्ट निश्चितपणे दिसत आहे ती म्हणजे आता आयपीएल ही केवळ एक स्पर्धा राहिलेली नाही तर ती क्रिकेटला नवं रूप देणारी, परिवर्तीत करणारी एक क्रांती बनली आहे. तसेच या परिवर्तनाला तुम्ही zuplay.com वरून फॉलो करू शकता.