Join us

SRH vs RR Head To Head Record: कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? यावेळी कोण मारेल बाजी?

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रायल्स यांचा कसा आहे एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 00:55 IST

Open in App

आयपीएल २०२५ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी क्रिकेट चाहत्यांसाठी डबल हेडरची मेजवानीचा बेत आखण्यात आलाय. यातील पहिला सामना पॅट कमिन्स याच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रियान परागच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगल्याचे पाहायला मिळेल. ही लढत हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात रंगणार आहे. या मैदानात धावांची 'बरसात' होताना पाहायला मिळते. त्यामुळे दुपारच्या सत्रात रंगणारा सामना क्रिकेट चाहत्यांचा दिवस एकदम खास करणारा ठरू शकतो. इथं एक नजर टाकुयात आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रायल्स यांचा कसा आहे एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड? जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

SRH विरुद्ध RR यांच्यात कोण कुणावर पडलंय भारी?

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २० सामने खेळवण्यात आले आहेत. यात सनरायझर्स हैदराबादचे पारडे जड दिसते. ११ सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघांने बाजी मारली असून ९ सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघाने बाजी मारली आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २० सामने खेळवण्यात आले आहेत. यात सनरायझर्स हैदराबादचे पारडे जड दिसते. ११ सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघांने बाजी मारली असून ९ सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघाने बाजी मारली आहे. मागील तीन सामन्यात सनरायढर्स हैदराबादनेच बाजी मारली होती. यात गत हंगामात दोन सामन्यातील विजयाचा समावेश आहे. यातील एक सामना चेन्नईच्या मैदानात रंगला होता. याशिवाय एक सामना हैदराबादच्या मैदानातच झाला होता.

बॅटिंगमध्ये संजूसह या बॅटरचा बोलबाला

दोन्ही संघातील लढतीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिन्ही नावे ही राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या खेळाडूंची आहेत. संजू सॅमसन ६९८ धावांसह आघाडीवर आहे. त्याच्यापोठापाठ जोस बटलर ३५४ धावांसह दुसऱ्या स्थानावर तर आरआरचा माजी खेळाडू अजिंक्य रहाणे ३४७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गत हंगामात क्वालिफायर २ मध्ये भिडले होते हे दोन संघ

आयपीएल २०२४ च्या क्वालिफायर २ मध्ये चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघात अखेरचा सामना झाला होता. या लढतीत ३६ धावांनी विजय नोंदवत सनरायझर्स हैदराबादच्या संघानं फायनल गाठली होती. पण फायनलमध्ये त्यांना कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.  

दोन्ही संघातील सर्वोच्च अन् निच्चांकी धावंसख्येचा रेकॉर्ड

 दोन्ही संघात सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड हा राजस्थान रॉयल्सच्या नावे आहे. हैदराबाद विरुद्ध त्यांनी २२० धावसंख्या उभारल्याचा रेकॉर्ड आहे. दुसऱ्या बाजूला सनरायझर्स हैदराबादच्या संघाने राजस्थान विरुद्ध २१७ अशी सर्वोच्च धावंसख्या केली आहे.  दोन्ही संघातील निच्चांकी  धावसंख्याही राजस्थानच्या नावे आहे. १०२ धावात संघ आटोपला होता. हैदराबादला त्यांनी १२७ धावात रोखले होते. ही हैदराबादची या संघाविरुद्धची निच्चांकी धावसंख्या आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सटी-20 क्रिकेटइंडियन प्रीमिअर लीग