Join us

ऑरेंज आर्मीची हवा! तेच ठोकतील का ३०० धावा? इथं पाहा IPL इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड

इथं एक नजर टाकुयात आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येच्या रेकॉर्ड्सवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 18:43 IST

Open in App

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघानं अगदी धमाक्यात सुरुवात केली आहे. या संघाच्या ताफ्यात एक गेला की दुसरा येतो तोही तुफान फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा आहे. याच ताकदीच्या जोरावर आयपीएल २०२५ च्या हंगामातील आपल्या पहिल्याच लढतीत २८६ धावा धावफलकावर लावल्या. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या आहे. जगातील लोकप्रिय स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्डही याच संघाच्या नावे आहे. या हंगामात इशान किशनच्या रुपात या ताफ्यात आणखी एक हिरोची एन्ट्री झालीये. त्यामुळे याच संघानं यंदाच्या हंगामात ३०० धावा लावल्या तर ते नवल वाटणार नाही. इथं एक नजर टाकुयात आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येच्या रेकॉर्डवर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कुणाच्या नावे आहे IPL च्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड

आयपीएलच्या स्पर्धेच्या गत हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघानं बंगळुरुच्या मैदानात रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात ३ विकेट्सच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात २८७ धावा केल्या होत्या. ही आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. 

सनरायझर्स हैदराबादनं पुन्हा उभारली मोठी धावसंख्या

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात इशान किशनचे शानदार १०६ (४७)* शतक आणि ट्रॅविस हेडच्या ६७ धावांच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघ नवा रेकॉर्ड सेट करण्याच्या अगदी उंबरठ्यावर होता. पण आपलाच  रेकॉर्ड मो़डून नवा रेकॉर्ड सेट करण्यासाठी अवघ्या दोन धावा कमी पडल्या. या सामन्यातील  ६ बाद २८६ धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघानं आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली. 

सर्वाधिक धावसंख्येच्या रेकॉर्ड्सच्या यादीत टॉप ५ मध्ये चार वेळा दिसतं SRH संघाचं नाव

सर्वाधिक धावसंखेच्या रेकॉर्डच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावरही सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझी संघाचाच नंबर लागतो. गत हंगामात हैदराबादच्या मैदानात त्यांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध ३ बाद २७७ धावा केल्या होत्या. २०२४ च्या हंगामात केकेआरच्या संघानं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विशाखापट्टणमच्या मैदानात ७ बाद २७२ धावा केल्या होत्या. ही आयपीएलच्या इतिहासातील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. आघाडीच्या पाचमध्ये पुन्हा सनरायझर्स हैदराबादचा नंबर लागतो. गत हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाविरुद्ध दिल्लीच्या मैदानात सनरायझर्स हैदराबादच्या संघानं ७ बाद २६६ धावा केल्या होत्या. ऑरेंज आर्मीचा हा रेकॉर्ड हा संघच ३०० पारचा नारा देण्याची धमक असणारा संघ आहे, असे वाटते. आघाडीच्या ५ सर्वोच्च धावसंख्येशिवाय २५० पेक्षा अधिक धावा करणारे संघ

  • आरसीबी- ५ बाद २६३ धावा विरुद्ध वॉरियर्स, बंगळुरु (२०१३)
  • पंजाब किंग्ज- २ बाद २६२ धावा विरुद्ध केकेआर, ईडन गार्डन्स (२०२४)
  • आरसीबी - ७ बाद २६२ धावा विरुद्ध एसआरएच, बंगळुरु (२०२४)
  • केकेआर- ६ बाद २६१ धावा विरुद्ध पंजाब किंग्ज, ईडन गार्डन्स (२०२४)
  • दिल्ली कॅपिटल्स - ४ बाद २५७ धावा विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली (२०२४)
  • एलएसजी- ५ बाद २५७ धावा विरुद्ध पंजाब किंग्ज, मोहाली (२०२३)
टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सटी-20 क्रिकेटइंडियन प्रीमिअर लीग