IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Punjab Kings Record Second Highest Innings Totals : हैदराबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन या अनकॅप्ड भारतीय जोडीनं संघालाद दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या भात्यातील फटकेबाजी पाहायला मिळाली. अखेरच्या षटकात मार्कस स्टॉयनिसनेही हैदराबादी गोलंदाजांचा समाचार घेतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यंदाच्या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या
सलामीवीर प्रियांश आर्य याने १३ चेंडूत २७६.९२ च्या स्ट्राइक रेटसह ३६ धावा करत प्रभसिमरन सिंगच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचली. प्रभसिमरन यानेही २३ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. सलामी जोडीनं दमदार सुरुवात करुन दिल्यावर श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवला. त्याने २२७.७८ च्या स्ट्राइक रेटनं ३६ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकार मारत ८२ धावा कुटल्या. अखेरच्या षटकात स्टॉयनिसनं ११ चेंडूत ३०९.०९ च्या स्ट्राइक रेटसह ३४ धावा कुटत पंजाबच्या धावफलकावर २४५ धावा लावल्या. यंदाच्या हंगामातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे.
Ishan Kishan Viral Video : इशान किशनने अडवलेला चेंडू हरवला; कॅप्टन पॅट कमिन्सला तो सापडला!
पंजाबची आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या
आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्जची ही दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या आहे. गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने २ बाद २६२ धावा केल्या होत्या. त्यानंतर आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ६ बाद २४५ धावा केल्या आहेत.
आयपीएलमधील पंजाब संघाचा सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड
- २ बाद २६२ धावा- विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, २०२४
- ६ बाद २४५ धावा-विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद, २०२५
- ५ बाद २४३ धावा-विरुद्ध गुजरात टायटन्स, अहमदाबाद, २०२५
- २ बाद २३२ धावा- विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, धर्मशाला, २०११
- ४ बाद २३१ धावा-विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कटक, २०१४
-
Web Title: IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Priyansh Arya Prabhsimran Singh Shreyas Iyer Marcus Stoinis Hit Show Punjab Kings Set Second Highest Innings Totals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.