Join us

IPL 2025 : २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा करत 'सिंग इज किंग' शो दाखवला, पण...

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध तो मागील डावातील कसर भरून काढत मोठी इनिंग खेळणार का ते पाहण्याजोगे असेल. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:00 IST

Open in App

IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Player to Watch Prabhsimran Singh Punjab Kings :  आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनेक अनकॅप्ड खेळाडू आपल्या भात्यातील दमदार फटकेबाजीचा नजराणा दाखवून देत आहेत. पंजाब किंग्ज ताफ्यातील सलामी जोडी या यादीत आघाडीवर आहे. प्रियांश आर्यसह प्रभसिमरन सिंग ही जोडी पंजाबच्या डावाची सुरुवात करताना दिसते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पंजाबच्या संघाचा अनकॅप्ड खेळाडूंवर भरवसा

यंदाच्या हंगामात पंजाब फ्रँचायझी एकमेव असा संघ आहे ज्यांनी  डावाची सुरुवात करण्यासाठी दोन अनकॅप्ड खेळाडूंवर भरवसा दाखवलाय. त्यांचा हा निर्णय योग्यही ठरला आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरन सिंग याने २०३ च्या स्ट्राइक रेटसह ६९ धावा कुटल्याचे पाहायला मिळाले होते. पण त्यानंतर तो अडखळत खेळताना दिसला. आता त्याच्यासमोर पुन्हा दमदार कमबॅक करून दाखवण्याचे चॅलेंज आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध तो मागील डावातील कसर भरून काढत मोठी इनिंग खेळणार का ते पाहण्याजोगे असेल. 

Video: त्रिवार सलाम! खुद्द 'कोच' रिकी पॉन्टींगने मैदानावरचा कचरा उचलला अन् डस्टबिनमध्ये टाकला...

यंदाच्या हंगामातील प्रभसिमरनची कामगिरी

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्रभसिमरन सिंग पहिल्यापासून पंजाब संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असल्याचे दिसते. गुजरात टायटन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात प्रभसिमरन सिंग अवघ्या ५ धावांवर तंबूत परतला. पण त्यानंतर लखनौ विरुद्ध ३४ चेंडूत ६९ धावांच्या खेळीसह त्याने आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिली. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात १७ धावांवर बाद झाल्यावर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याला खातेही उघडता आले नव्हते.

डावाची सुरुवात करताना शतक झळकवल्याचाही रेकॉर्ड

पंजाबच्या संघानं २०१८ मध्ये ४.८  कोटी बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले होते. २०१९ च्या हंगामात त्याला पदार्पणाची संधी मिळाली. या हंगामात तो फक्त एकच सामना खेळला. २०२३ च्या हंगामात त्याने सलामीवीराच्या रुपात संघाकडून खास छाप सोडली होती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने ६५ चेंडूत १०३ धावांची खेळी केली होती.  एक शतक आणि ४ अर्धशतकासह त्याच्या खात्यात ३८ सामन्यात ८४७ धावा आहेत. यंदाच्या हंगामात त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षा असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्ससनरायझर्स हैदराबादइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट