Abhishek Sharma Record Highest IPL Score By An Indian : सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने शनिवारी हैदराबादच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. पंजाबच्या संघाने दिलेल्या २४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ५५ चेंडूत १४१ धावांची मॅच विनिंग खेळी केली. आयपीएलमधील पहिले शतक झळकावताना अभिषेक शर्माने खास विक्रमाला गवणी घातली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् अभिषेक शर्माच्या नावे झाला खास विक्रम; केएल राहुललाल टाकले मागे
पंजाब विरुद्धच्या सामन्यात २५६.३६ च्या स्ट्राइक रेटसह १४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १४१ धावांची खेळी करत अभिषेक शर्मानं भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आपल्या नावे केला. याआधी हा विक्रम लोकेश राहुलच्या नावे होता. केएल राहुलनं २०२० च्या हंगामात आरसीबीकडून खेळताना वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्ध ६९ चेंडूत १३२ धावांची खेळी केली होती. आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत तो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत ख्रिस गेल १७५ धावांसह पहिल्या तर ब्रेंडन मॅक्युलम १५८ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
"धिस वन इज फॉर ऑरेंज आर्मी"... नो बॉलवर फ्री हिट मिळते; अभिषेक शर्माला सेंच्युरी मिळाली!
IPL मध्ये भारतीय खेळाडूच्या बॅटमधून आलेली तिसरी जलद शतकी खेळी
अभिषेक शर्मानं ४० चेंडूत आयपीएलमधील पहिले शतक साजरे केले. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत भारतीय खेळाडूच्या भात्यातून निघालेली ही तिसरे जलद शतक आहे. या यादीत युसूफ पठाण ३७ चेंडूतील शतकासह अव्वलस्थानावर आहे. आणि प्रियांश आर्य (३९) नंतर भारतीय खेळाडूने तिसरे सर्वात जलद शतक ठरले.
आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
- १७५* - ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु) विरुद्ध पुणे इंडिया वॉरियर्स, २०१३
- १५८* - ब्रेंडन मॅक्युलम (कोलकाता नाईय रायडर्स) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, २००८
- १४१ - अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद) विरुद्ध पंजाब किंग्ज, २०२५*
- १४०* - क्विंटन डिकॉक (लखनौ सुपर जाएंट्स) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २०२२
- १३३* - एबी डिव्हिलियर्स (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु) विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१५
- १३२* - केएल राहुल (किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, २०२०