'अनसोल्ड' राहिल्यावर शार्दुलनं परदेशात खेळण्याचाही आखला होता प्लॅन; झहीर खानचा कॉल आला अन्...

आयपीएलमध्ये 'अनसोल्ड' राहिल्यावर पुढे काय करायचे या अष्टपैलूने ठरवले होते, पण मग झहिरचा कॉल आला अन् आज तो लखनौचा हिरो झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 00:39 IST2025-03-28T00:37:02+5:302025-03-28T00:39:27+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 SRH vs LSG Shardul Thakur Unsold at IPL auction He Reveals Comeback Story Zaheer Khan’s Phone Call That Secured Last Minute IPL Entry | 'अनसोल्ड' राहिल्यावर शार्दुलनं परदेशात खेळण्याचाही आखला होता प्लॅन; झहीर खानचा कॉल आला अन्...

'अनसोल्ड' राहिल्यावर शार्दुलनं परदेशात खेळण्याचाही आखला होता प्लॅन; झहीर खानचा कॉल आला अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सच्या संघानं घरच्या मैदानात खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. संघाच्या विजयात शार्दुल ठाकूरनं मोलाचा वाटा उचलला. जो संघ आघाडीच्या फळीतील स्फोटक फलंदाजांमुळे चर्चेत आहे त्या संघाविरुद्ध शार्दुल ठाकूरनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सामनावीर ठरला अन् पर्पल कॅपही शार्दुलकडे गेली

पहिल्या स्पेलमधील आपल्या दुसऱ्या षटकात अभिषेक शर्मापाठोपाठ पहिल्या सामन्यातील शतकवीर इशान किशनला गोल्डन डक करत शार्दुल ठाकूरनं सनरायझर्स हैदराबादच्या संघाला बॅकफूटवर ढकललं. दुसऱ्या स्पेलमध्ये दोन विकेट्स घेत त्याने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यावर बदली खेळाडूच्या रुपात लखनौच्या ताफ्यात सामील झालेल्या शार्दुल ठाकूर दुसऱ्या सामन्यात सामनावीर ठरला. एवढेच नाही तर आता पर्पल कॅपही त्याच्याकडेच गेली आहे.  सामन्यानंतर त्याला अनसोल्ड राहिल्यावर आयपीएल खेळण्याची मिळाले्या संधीसंदर्भात विचारण्यात आले. यावेळी त्याने  'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीमागचा खास किस्सा किस्सा शेअर केला. 

Shardul Thakur 100 IPL Wickets : खणखणीत 'चौकारा'सह शार्दुल ठाकुरनं साजरं केलं विकेट्सचं 'शतक'

झहीर खानचा कॉल आला अन् ....
 
शार्दुल ठाकूर म्हणाला की, लिलावात जे घडलं तो एक वाईट अनुभव होता. कोणत्याही फ्रँचायझी संघाने माझ्यावर विश्वास दाखवला नाही. पण क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. लिलावाचा भाग नसल्यामुळे देशांतर्गत क्रिकेटसह इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा विचार केला होता. हा प्लॅन तयार असताना लखनौच्या संघाकडून  आयपीएलमध्ये खेळण्याची ऑफर आली.  झहीर खान यांनी कॉल केला आणि आयपीएलचे दरवाजे उघडले, अशी गोष्ट त्याने शेअर केली आहे.  

वैयक्तिक कामगिरीशिवाय संघाचा विजय महत्त्वाचा  

शार्दुल ठाकूर याने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरीसह या स्पर्धेत १०० विकेट्सचा टप्पाही गाठला. पण वैयक्तिक कामगिरीशिवाय संघाचा विजय महत्त्वाचा वाटतो, ही गोष्टही त्याने बोलून दाखवली. स्कोअरशीटवर धावा किंवा विकेट्सचा कॉलम  भरलेला असणं नेहमीच चांगले आहे. पण माझी प्राथमिकता ही सामना जिंकण्याची असते. त्यासाठी सर्वोत्तपरी देण्याचा प्रयत्न करतो, असेही या अष्टपैलू खेळाडूनं म्हटले आहे.

Web Title: IPL 2025 SRH vs LSG Shardul Thakur Unsold at IPL auction He Reveals Comeback Story Zaheer Khan’s Phone Call That Secured Last Minute IPL Entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.