IPL 2025 SRH vs KKR Heinrich Klaasen Slams Joint Third Fastest Century : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील अखेरच्या सामन्यात हैदराबादच्या ताफ्यातील हेनरिक क्लासेन याने कोलकाता विरुद्ध विक्रमी सेंच्युरी झळकावली आहे. त्याने अवघ्या ३७ चेंडूत शतक साजरे केले. भारताचा माजी क्रिकेटर युसूफ पठाणच्या विक्रमाची बरोबरी करत त्याने आयपीएलच्या इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात जलदगतीने सेंच्युरी झळकावली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीगमध्ये सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे आहे. २०१३ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कडून खेळताना त्याने ३० चेंडूत शतक साजरे केले होते. यंदाच्या हंगामात १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीनं ३५ चेंडूत शतक झळकावले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील हे दुसरे सर्वात जलद शतक; वैभव सूर्यंवशी विक्रम सेफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 21:40 IST