IPL 2025 SRH vs KKR 68th Match Player to Watch Venkatesh Iyer Kolkata Knight Riders : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा संघ यंदाच्या हंगामात प्लेऑफ्समध्येही एन्ट्री करू शकला नाही. मेगा लिलावाआधी संघाने जी मोठी चूक केली त्यात ते फसले. ज्या श्रेयस अय्यरनं संघाला चॅम्पियन केलं त्याला रिटेन करण्याऐवजी कोलकाताच्या संघाने व्यंकटेश अय्यरवर मोठा डाव खेळला. या गड्यासाठी या संघाने तब्बल २३.७५ कोटी रुपये मोजले होते. पण त्याने घोर निराशा केली. आता या गड्यानं शाहरुख खानला चुना लावला म्हणायचं का? तर अजिबात नाही. ज्यांनी कुणी या खेळाडूसाठी मोठा डाव खेळण्याचं धाडस दाखवलं त्याचीच ही चूक.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोठी रक्कम अन् उप-कर्णधारपदाची जबाबदारी, पण...
फ्लॉप शोनंतर व्यंकटेश अय्यरनं एक वक्तव्य केले होते, ज्याची चांगलीच चर्चा झाली. अधिक पैसा मिळाला म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये खेळायलाच हवे असे नाही. संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलण्याची जबाबदारी पार पाडण्याला महत्त्व देतो, अशा आशयाचे वक्तव्य त्याने केले होते. या वक्तव्यावरून तो ट्रोलही झाला. मूळात मला एवढा पैसा द्या मी तुमच्याकडून खेळतो असं कोणताही खेळाडू म्हणत नाही. तो अधिकार त्याला नसतोच. पण मोठी रक्कम मिळाल्यावर जबाबदारीच भान दाखवणं गरजेचे होते. पण तेही त्याला जमले नाही. मोठी रक्कम देऊन त्याला उप कर्णधारही करण्यात आले. हा निर्णयही एकदम चुकीचा ठरला.
IPL 2025 : विदर्भकराला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी SRH कडून फिरकीतील जादू दाखवण्याची संधी
KKR च्या संघानं ज्याला नारळ दिला त्यानं PBKS कडून सोडली नेृत्वाची छाप
आयपीएलच्या मेगा लिलावाआधी रिटेन रिलीजच्या खेळात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने श्रेयस अय्यरला नारळ दिला. इथंच संघ फसला. दुसरीकडे ज्याला श्रेयस अय्यरनं पंजाबच्या संघाचे नेतृत्व करत नवा इतिहास रचला. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि आता पंजाबचा संघ प्लेऑफ्समध्ये पोहचला आहे. आयपीएलमध्ये कॅप्टन्सीत अशी छाप सोडणारा तो एकमेव खेळाडू आहे. केकेआरनं त्याच्यावर विश्वास दाखवला असता तर निश्चितच चित्र वेगळे असते.
व्यंकटेश अय्यरची यंदाच्या हंगामातील कामगिरी
व्यंकटेश अय्यरनं यंदाच्या हंगामात ११ सामन्यात फक्त एक अर्धशतकासह २०.२९ च्या सरासरीसह १३९.२२ च्या स्ट्राइक रेटनं १४२ धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने २९ चेंडूत ६० धावांची खेळी केली होती. याशिवाय लखनौ विरुद्ध २९ चेंडूत केलेली ४५ धावांची खेळी वगळली तर तो धावांसाठी संघर्षच करताना दिसून आले. आगामी हंगामात संघ चुकीच्या अय्यरवर मोठी जबाबदारी टाकण्याआधी शंभर वेळा विचार करेल.