SRH vs GT : हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीचा फुगा पुन्हा फुटला! मॅच जिंकल्यावर शुबमन गिलनंही हाणला टोला!

घरच्या मैदानात सनरायझर्सला पराभूत केल्यावर शुबमन गिलनं मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 23:31 IST2025-04-06T23:28:36+5:302025-04-06T23:31:22+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 SRH vs GT Shubman Gill Fifty After Mohammed Siraj Four For Helps Gujarat Titans Beat Sunrisers Hyderabad | SRH vs GT : हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीचा फुगा पुन्हा फुटला! मॅच जिंकल्यावर शुबमन गिलनंही हाणला टोला!

SRH vs GT : हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीचा फुगा पुन्हा फुटला! मॅच जिंकल्यावर शुबमन गिलनंही हाणला टोला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans, 19th Match : शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाला पराभूत करत यंदाच्या हंगामातील आणखी एका विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकल्यावर शुबमन गिलनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना आयपीएलच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत हैदराबादच्या स्फोटक बॅटिंगचा फुगा फोडला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गुजरातनं सहज मिळवला विजय

सिराजचा भेदक मारा अन् त्याला इतर गोलंदादांनी दिलेली साथ याच्या जोरावर गुजरातच्या संघाने तगडी फलंदाजी असलेल्या हैदराबादच्या संघाला निर्धारित २० षटकात ८ बाद १५२ धावांवर रोखले. धावांचा पाठलाग करताना गुजरातचा कर्णधार शुबमन गिलनं संयमी खेळी करत नाबाद अर्धशतक झळकावले. त्याला वॉशिग्टंन सुंदरनं उत्तम साथ दिली. तो माघारी फिरल्यावर शेरफेन रुदरफोर्डने आपल्या फटकेबाजीचा नजराणा दाखवून दिला. गुजरातच्या संघानं १७ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ७ गडी राखून तिसऱ्या विजयाची नोंद केली.

Mohammed Siraj Record : सिराजसाठी दुग्धशर्करा योग! IPL मधील सर्वोच्च कामगिरीसह साधला 'शतकी' डाव

मॅच जिंकल्यावर शुबमन गिलचा हैदराबादच्या स्फोटक फलंदाजांना टोला

सामना जिंकल्यावर शुबमन गिलनं हैदराबादच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाजांना अप्रत्यक्षरित्या टोला मारल्याचे पाहायला मिळाले. टी-२० क्रिकेटमध्ये फक्त फटकेबाजी करायची असते, असे काहींना वाटते. पण तसे नाही. क्रिकेट बूकमधील शॉट्स खेळून तुम्ही सामना जिंकू शकता, अशा आशयाचे वक्तव्य शुबमन गिलनं केले. हा हैदराबादच्या तगडी फलंदाजी करण्याची क्षमता असणाऱ्या पण मोठे फटकेबाजी करण्याच्या नादात सातत्याने फ्लॉप ठरणाऱ्या फलंदाजांना एक टोलाच होता. हे ऐकून तर ते सुधारणार का? ते पाहण्याजोगे असेल.

सिराजच्या भेदक माऱ्यासमोर  सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांचा नाही लागला निभाव  

घरच्या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करताना ट्रॅविस हेड ८(५), अभिषेक शर्मा १८ (१६) आणि इशान किशन १७ (१४) हे महागडे गडी पुन्हा एकदा स्वस्तात माघारी फिरले. क्लासेनं क्लास दाखवतोय असे वाटले. पण त्याचा खेळही १९ चेंडूत २७ धावांवर खल्लास झाला. नितीश कुमार रेड्डीनं ३४ चेंडूत केलेल्या ३१ धावा ही तगडी बॅटिंग ऑर्डर असलेल्या हैदराबादच्या संघाची सर्वोच्च धावसंख्या राहिली. अखेरच्या षटकात कर्णधार पॅट किमिन्स याने केलेल्या ९ चेंडूतील नाबाद २२ धावांच्या खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादच्या संघानं धावफलकावर १५२ धावा लावल्या.  गुजरातकडून सिराजनं सर्वाधिक ४ तर प्रसिद्ध कृष्माा आणि साई किशोर यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. 

धावांचा पाठलाग करताना गिलच्या नाबाद अर्धशतकासह वॉशिंग्टन सुंदर अन् रुदरफोर्डची फटकेबाजी

हैदराबादच्या संघानं दिलेल्या १५३ धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीनं गुजरातच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या १५ धावा असताना फार्मात असलेला साई सुदर्शन ५ धावांवर बाद झाला. मोहम्मद शमीनं त्याची विकेट घेतली. पॅट कमिन्सनं जोस बटलरला शून्यावर माघारी धाडत सामन्यात येण्याचे संकेत दिले. पण त्यानंतर गुजरातच्या ताफ्यातून एक नवा डाव खेळण्यात आला. वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला आला. त्याने  शुबमन गिलच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करत सामना गुजरातच्या बाजूनं सेट केला. त्याने २९ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ४९ धावा केल्या.  शमीने त्याची विकेट घेतली. पण तोपर्यंत सामना गुजरातच्या बाजूनं झुकला होता.  त्याच्या जागी आलेल्या शेरफेन रुदरफोर्ड याने १६ चेंडूत ३५ धावा कुटल्या. याशिवाय दुसऱ्या बाजूला शुबमन गिल ४३ चेंडूत ६१ धावा करून नाबाद राहिला. 

Web Title: IPL 2025 SRH vs GT Shubman Gill Fifty After Mohammed Siraj Four For Helps Gujarat Titans Beat Sunrisers Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.